पाऊले चलती..

पाऊले चलती…



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पाऊले चलती
दिंडोरीची वाट
गुरुमाऊलींच्या
दर्शनाची आस
पाऊले चलती
दिंडोरीची वाट !!धृ!!

साक्षात परब्रम्ह
इथे अवतरले
दुःखीतांचे जीवन
लीलया सावरले
आनंदाच्या झाडांचे
निर्मीयले पाट
पाऊले चलती…. !!१!!

मन शांत होते
होता दृष्टादृष्ट
दूर होई सारे
क्लेश नी आरिष्ट
माझ्या माऊलीचा
काय सांगू थाट
पाऊले चलती … !!२!!

सेवामार्ग भला
सेवेकऱ्या दिला
पूर्व संचिताचा
मेवा लुटण्याला
मार्ग सदाचाराचा
सोपी वहिवाट
पाऊले चलती …!!३!!

माझ्या माऊलीचे
उपकार फार
दुजे होणे नाही
ऐसे संत थोर
उचलला सारा
सन्मार्गाचा घाट
पाऊले चलती …!!४!!

डॉ.पद्मा जाधव-वाखुरे,औरंगाबाद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles