
सावित्रीदेवी विद्यालयात मानसिक स्वास्थ्य या विषयावर चर्चासत्र
मुंबई: डोंबिवलीच्या श्रीमती सावित्रीदेवी बसप्पा हेब्बळ्ळी विद्यालयाच्या टेरेसवरील सभागृहात इयत्ता ७ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांचे शनिवार दि.१ जुलै रोजी “मानसिक स्वास्थ्य” या विषयावर सामाजिक ऋणानुबंध ही मुख्य संकल्पना विचारात घेऊन प्रसिद्ध विचारवंत बिलोरी यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज व चर्चासत्र संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आदरणीय मुख्याध्यापक संतोष कोळी सर यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन खंडागळे सर यांनी केले.विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांवर बोलते करून त्यांच्या शंकांचे निरसन करून बिलोरी सरांनी कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमात श्री धनंजय थळे सर यांनीही त्यांच्या ओघवत्या शैलीत संवाद साधला.
कार्यक्रमाचा समारोप श्री रामकृष्ण शिंपी सर यांनी आभार प्रदर्शनाने केला.शिवाय मानसिक स्वास्थ्य ह्या आजच्या काळातील ज्वलंत समस्येवर बोलल्याबद्दल प्रसिद्ध वक्ते बिलोरी सर व त्यांचे सहकारी गमरे यांचे विशेष कौतुक केले.विद्यार्थी व पालक यांच्याकडून या विषयावर पहिल्याच महिन्यात चर्चासत्र आयोजित केल्यामुळे शालेय व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.