एकांतवास..

एकांतवास



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मैत्री आपली अनमोल
लाभला छान सहवास
तुझ्या माझ्या मैत्रीचा
असा सुंदरसा प्रवास||१||

चार वर्षांपूर्वी दोघांची
अशी ओळख झाली
माझ्या या जगण्याला
नवी दिशा मिळाली||२||

तुझा खांद्यावरी हात
देई लढण्याचे बळ
तुझ्या सोबतीने मित्रा
मिळेल कष्टाचे फळ||३||

चार वर्षाच्या मैत्रीत
नाते घट्ट हे जुळले
मैत्रीच्या विश्वाचे मज
सुंदर गणित कळले||४||

मैत्रीच्या प्रवासात असा
तुझा होता छान सहवास
तुझी साथ अशी सुटता
नशीबी आला एकांतवास||५||

विनायक कृष्णराव पाटील बेळगाव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles