
बोभाटा..
समजून न घेता मला तू
केलास नाहक बोभाटा
गैरसमज करून घेतला
नात्यात आणलास फाटा..
मनात नव्हताच माझ्या
कसला वाईट विचार
फक्त सांगू शकले नाही
केलास सगळीकडे प्रचार..
जरा काय मी तुझ्या
मनाविरूध्द वागले
चुकिचं समजून मज
वाळीत का टाकले?
माझ्या मनाचा केला
नाहीस साधा विचार
तुझ्या मनात होता
तुझ्याच बद्दल अपार..
उगाच राईचा पर्वत
करून केलास बोभाटा
आयुष्यात रोवलास
विषारी कटू काटा..
प्रज्ञा सवदत्ती,रायगड