
इतिवृत्त
म्हणतेय बसावे एकदा लिहायला इतिवृत्त जीवनाचे
जन्मल्यापासून सोसणे अन् भोगलेल्या यातनांचे
सुरूवात कोठून करावी काही समजत नाही
जगण्यातल्या दु:खांचा अंतच सापडत नाही
एक आठवता आठवते दुसरेच क्रम जुळत नाही
कोंडून ठेवलेल्या आकांताला वाट मिळत नाही
हातातल्या पेनावर मग ताबा राहात नाही
काय गेलो लिहित याचा धागा जुळत नाही
चुकलेल्या भावनांवर मग रेषा मारत बसते
एक एक पान फाडून पुन्हा जाळत बसते
ठरवते मग पुन्हा एकदा एकांती लिहिन सारे
माझ्या इतिवृत्ताचे असेच काहीसे वाहत असते वारे
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड