कौशल्य प्राप्त केल्यास हमखास रोजगाराची संधी’; मिलिंद हट्टेकर

‘कौशल्य प्राप्त केल्यास हमखास रोजगाराची संधी’; मिलिंद हट्टेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद: एकविसाव्या शतकात आवश्यक असणारी कौशल्य युवकांनी प्राप्त केली तर त्यांना रोजगाराची हमखास संधी उपलब्ध असून त्यासाठी आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता विकसित करण्याचे आवाहन नागेश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक मिलिंद हट्टेकर यांनी नुकतेच केले .यवतमाळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मार्फत फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे आयोजित महाराष्ट्र सरकारच्या शासन आपल्या दारी ह्या उपक्रमा अर्तंगत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

सरकारी नोक-या झपाट्याने कमी होत आहेत अशावेळी खाजगी क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे या आव्हानांचा मुकाबला विविध कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन करता येणे शक्य आहे त्यासाठीची जिद्द युवकांनी बाळगावी असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सोनटक्के हे होते कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचलन प्रा. विलास भवरे त्यांनी केले
या रोजगार मेळाव्यात 1166 पदांसाठी विविध कंपन्या व आस्थापनांमधील अधिकाऱ्यांनी रोजगार मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या व नियुक्तीपत्र दिले.

जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती विद्या शितोळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विशाल मनवर,राहुल गुल्हाने,प्रशांत ढेपे, संदीप यादव यांनी या मेळाव्याचे सुरेख नियोजन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश इन्फोटेक चे संचालक अनिल हट्टेकर ,शुभम् वाळले,पवन भोयर, महेश राऊत, सतीश काकडे,कोमल पाईकराव,नंदा वंजारे,सपना ढाकरे, वैष्णवी माहुले, छकुली भांगे,सुप्रिया इंगोले,दिपाली जोगदंडे इत्यादी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles