आज मीही ठरवले

आज मीही ठरवले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जीवनात आजवरी प्राशिले
अपमानाचे जहरी प्याले
अमृतमय ते सारे मानले
दु:खाला सौख्याने हरविले

काटे पसरून किती ठेवले
वाटेवर रक्ताळली पाऊले
मानले फुलपंख विखुरले
काटेही खुपणेच विसरले

भवताली अंधार दाटला
भयाण ऐसा कभिन्न काळा
तिमिरात तेजाळला तारा
मनात प्रकाश फुलला

आज मीही ठरविले
क्षणोक्षण आनंद भारले
दु:खाचे मग सावट कुठले
हर्षाचे शत तरूची बहरले

जीवनी सप्तरंग उधळले
सौख्य तरंगची लहरले
भरले मनीचे आठव-तळे
क्षण असे गंधाळून गेले

काट्यांची ही मृदुशार फुले
पावलांखाली पराग इवले
आले कवेत आकाश‌ निळे
अता माझे मीपण कुठले?

वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक परीक्षक,सहप्रशासक
सांगली
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles