
उठ युवका जागा हो
उठ युवका जागा हो
नको जाऊ व्यसनात
इतका सुंदर हा देह
उगाच जाई मसनात
आधारस्तंभ देशाचा
भविष्य तुझ्या हाती
शिक्षणातून दे तु
नव्या विचारला गती
थोर महापुरुषांचा
उरी बागड आदर्श
स्वबळावर लढण्याचा
मनात असू दे संघर्ष
आईबापाची सेवा
स्त्रियांचा कर सन्मान
वायफळ गोष्टीला
नको देऊ तू मान
नको विसरू युवका
भारताची संस्कृती
फॅशनच्या नावावर
अंगी आणतो विकृती
कुशल डरंगे, अमरावती
======