पुसद व महागाव परिसरात घरफोडी व दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

पुसद व महागाव परिसरात घरफोडी व दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यातपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_२ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त_

_स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने दोन चोरटे ताब्यात_

तालुका प्रतिनिधी पुसद

पुसद: पुसद व महागाव परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटना होत्या.घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनेने नागरिक वैतागली होते.घरफोडी व दुचाकीच्या दाखल गुन्ह्यातील चोरटे पुस नदीच्या काठाजवळील जलशुद्धीकरण केंद्र जवळून एका द दुचाकीवर दोघे जण जात असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दोन्ही चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता.अशावेळी मागे बसलेला एक चोरटा पळण्यात यशस्वी झाला.तर एक चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले.

स्थागुशाने विचारपूस केली असता चोरट्याने २ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे कबूल केले आहे.चोरट्याने चोरलेला सर्व मुद्देमाल स्थागुशाने जप्त केला आहे. दुचाकीवरून पळून गेलेल्या चोरट्याचे नाव सांगितले.

पुसद परिसरात चोरी करणारा प्रवीण उर्फ पऊ सुदाम जाधव वय २७ वर्षे रा.पार्वती नगर व महागाव परिसरात चोरी करणारा हसन खान दौलत खान (चौधरी) वय ५० वर्षे रा.अखेरत नगर,पुसद याला पोलिसांनी पकडले आहे.

प्राप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे,पोलीस उपनिरीक्षक सागर बारस्कर,पंकज पातुरकर,अमलदार तेजाब खान रणखांब,सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार,सोहेल मिर्झा,सुनील पंडागळे,मोहम्मद ताज, दिगंबर गीते हे दि.५ जूलै २०२३ रोजीच्या रात्री पेट्रोलिंग करत होते.पेट्रोलिंग करत असताना पुसद व महागाव परिसरातील घरफोडी व दुचाकी चोरटे जलशुद्धीकरण केंद्राजवळून जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जलशुद्धीकरण केंद्र जवळ सापळा रचला.दाखल गुन्ह्यातील प्रविण उर्फ पऊ व त्याच्या साथीदार चोरीचीच मोटर सायकल घेवून येतांना दिसले.त्या दोघालाही पकडण्याचा प्रयत्न केला असता मोटर सायकल चालकाने वाहन धुम स्टाईलने पळविली अशावेळी व मोटार सायकलवर मागे बसुन असलेला चोरटा पळून गेला. पेट्रोलिंग करत असलेल्या स्टाफच्या मदतीने मोटार सायकल चालकास ताब्यात घेतले.पळून गेलेला त्याचा साथीदार धनकेश्वर वार्डात राहणाऱ्या आकाश कांबळेचे नाव सांगीतले.त्याचे ताब्यात असलेले वाहन हिरो स्प्लेंडर क्रमांक एम.एच.२९,एजी ८४९६ बाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.चोरट्याच्या ताब्यातील वाहन वसंतनगर हद्दीतून चोरी गेले असल्याची माहिती प्राप्त झाली.अटक केलेल्या प्रविणला अधिक विचारपुस केली असता त्याने मोटर सायकल चोरी बरोबरच घरफोड्या सुध्दा केल्याचे कबूल केले आहे.

*चोरट्याकडून कडून २ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडून ४ मोटर सायकल,३ एलईडी टिव्ही व एक सिलेंडर असा एकूण २लाख ८९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.दोन्ही चोरट्याला पुढील कार्यवाहीसाठी वसंतनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles