
जिल्हाधिकाऱ्यांचा ई पीक पाहणी प्रात्यक्षिकात सहभाग
वर्धा: वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून ई पीक पाहणी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सोयाबीन बीबीएफ पेरणी प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
राज्यात ईपीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीने सर्वत्र ही पाहणी प्रात्यक्षिके केली जात आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज देवळी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला सोयाबीनच्या रुंद सरी वरंबा (बीबीएफ) पद्धतीने पेरणीच्या प्रात्यक्षिकाची देखील पाहणी केली
बीबीएफ पद्धतीने पेरणी केली असता बियाणांची बचत होते अतिरिक्त पाण्यामुळे पिकाला धोका होत नाही पिकांमध्ये हवा खेळती राहते सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो असे मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची पिक पाहणी बाबत नोंदणी ई पीक पाहणी ॲप द्वारे मोबाईल वरून करावी व त्या अनुषंगाने शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.