
बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करणाऱ्या बीडच्या कला केंद्रावर पोलिसांची धाड
_बीडच्या केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार_
_5 अल्पवयीन मुलींसह 17 पीडीत महिलांची सुटका; तर 28 ग्राहक ताब्यात._
बीड: बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या उमरी गावात महालक्ष्मी कला केंद्रावर पोलिसांनी धाड टाकलीय. यात तब्बल 5 अल्पवयीन मुलीसह 17 महिला आणि 28 पुरुष ग्राहक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत..या कला केंद्रावर कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पोलीस तपासात उघड झालं आहे.. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी दिली..तसेच यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान बीड तालुक्यातील उमरी गावात सुरू असलेल्या कला केंद्र संदर्भात उमरी ग्रामपंचायत अगोदर पोलीस प्रशासनाला पत्रही दिले होते. यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने हे सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.. त्यामुळं आता एफआयआरमध्ये कुणाचं नाव येणार का ? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे..