शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*समायोजन*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बदलत्या मानसिकतेने
संयमाचे महत्व संपले
चार जणांच्या कुटुंबात
आता घरपण कुठे उरले

आपले घरटे म्हणून
तिचा जीव तुटतो
अन अहम चा पडदा
एक एक नाती गिळतो

समायोजन संवादाचे
जणू तिची जबाबदारी
चार शब्द ऐकण्यासाठी
आसुसते कान परि

समायोजन मनाचे
सांगा किती करायचे
इतरांचे मन जपताना
आपण मनांत झुरायचे

*सौ. रजनी भागवत*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*

“अडचणींचा सामना करताना
करावे लागते योग्य समायोजन ”
“सद्यस्थितीत अडचणीवर मात
करून सुयोग्य करावे नियोजन ”

“परिस्थितीशी जुळवून घेऊन
निसर्गाशी करावे समायोजन ”
“भयंकर दुष्काळजन्य स्थितीत
मानवाने करावे जलनियोजन ”

“वर्तमानस्थितीत फेरबदल होताना
आपण प्रत्येक क्षेत्रात पाहतो ”
“हे फेरबदल होताना माणूस
सद्यस्थितीत समाधानच मानतो ”

“नवीन विवाहित मुलीला तिच्या
सासरी योग्य समायोजन करते ”
“स्वतःच्या आवडीनिवडी विसरून
सासरशी स्वतः एकरूप होते ”

“नवीन शाळेत, नवीन गावांत
शिक्षकांचे समायोजन होते ”
“शिक्षकांना परिस्थितीशी जुळवून
जुळवून घेणे हितावह असते ”

*✍️ श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह )*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*समायोजन*

सगळं तरी मनाजोगं कसं
होईल केलेलेच नियोजन ,
समोरील परिस्थीती पाहून
करावं लागत समायोजन..!

मिळतंजुळतं घ्यावं लागत
दोन पाऊल पुढंही जाऊन ,
कधी दोन पाऊल मागे ही
वळावं लागतंय वेळ पाहून..!

खुप तडजोड करून सुद्धा
ताळमेळ जेव्हा बसत नाही ,
स्वतः स्वतःला खात राहतं
आपलं मन ग्वाही देत नाही..!

भूतकाळ पाठलाग सोडीना
जवा भविष्यकाळ घडतांना ,
किती संयम बाळगावा तरी
जीवनी समायोजन करतांना..!

खूपदा थकून जातो आपण
विचार थैमान सुरू डोक्यात ,
अनपेक्षित घटनाही घडतात
कधी नसतातही आवाक्यात..!

तरीपण खचून नाही जायचं
झगडायच दोन हात करून ,
सामना करायचा संकटाशी
योग्य ते समायोजन घडवून..!

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*

ताजा ताजा भाजीपाला
बाजारातून आलो घेऊन
दारात पाय ठेवताच कारभारीने
पिशवी घेतली आनंदाने हातातून

म्हणे बर झालं आले वेळेवर
भाजीला फोळणी देणारच होती
घरातले टमाटर संपले म्हणून
मी तुम्हाला फोन करणार होती

बाहेर भाजीवाला ओरडत होता
दीडशे रुपये किलो टमाटर
ती म्हणे अहो खरंच वाढले का
टमाटरचे इतके दर

तो खरंच बोलत होता
म्हणून मी सुद्धा आणले नाही
ती म्हणे भाजीला कशी येईल चव
भाजी बिघडली तर म्हणायचं नाही

अगं समजू शकतो तुझा राग
काही दिवस करू समायोजन
तुझ्या हातात आहे अनोखी जादू
टमाटर शिवाय बनवतेस तू चविष्ट भोजन

*कुशल गो डरंगे, अमरावती*
*@सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*

नवरी मुलगी नवखी
येते सासरी कुटुंबात
समायोजन करताना
बावरते ती हमखास

अनोळखी नाते तिला
रूजवावे लागती मनात
सरावाने सहज शक्य
करी आपलेसे सर्वास

प्रत्येकाची स्वभाववैशिष्ट्ये
कळू लागतात हळूहळू
नवखी नवरी संसारात
लागते हळू सर्वांशी रूळू

दीर,सासरा,सासू
जाऊ,नणंद पतीराज
घेती सामावून तिला
अलवार कुटुंबात

नवा जीव कुटुंबात
एकरूप होतो क्षणी
कर्तव्याची ठेवून जाण
बनते ती घराची राणी

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*

पक्ष बदलतात वेळोवेळी
झगडतात सारे खुर्चीसाठी
शुभ्र वस्त्रधारी पुढाऱ्यांची
मनमानी चाले सत्तेसाठी

फुकटाची शान मारून
मिरवतात नेते स्वतःला
लोकशाही धोक्यात आणून
फसवतात सामान्य जनतेला

मानमर्याद सोडून सारी
विरोधी पक्ष जवळ करतात
जनतेचे हित बाजूला सारून
आपलाच स्वार्थ साधतात

सत्ता बदलताच विस्कटते घडी
समायोजन करण्या काळ लोटतो
माजवून इथे मग हुकुमशाही
आम्ही जनतेसाठीच म्हणतो

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*

उपटले रोप
दुज्या दारी लावले
येगळ्या मातीत
तेही बावरले..

दिन नवलाईचे
मूळ रुजताना
उडे धांदल
वावर करताना…

ही कोणती माती
हे कसले पाणी
सारेच नवनवे
आले कुण्या रानी…

मिळता ओलावा
धरू लागले तग
कळले तया आता
हेच माझे जग…

पालवले मनी
बहरून आले
अरे समायोजन
जमले जमले…

जात लेकीची
अशीच बहरते
नव्या जगातही
सामावून जाते..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*

का रे ढगा वर पहायला लावतोस
गरीब माझा शेतकरी म्हणून का छळतोस

राब राब राबतो कष्टच त्याच्या जीवनी
आयुष्यभर फरफट लिहिली त्याच्या नशिबी

पहाट कशी उगवते सूर्य कसा मावळतो
निसर्गाशी रोजच नवे नाते तो जुळवतो

कमाई नसेल काही परि असतो संपत्ती राखून
प्रेम माया आपुलकीची शिदोरी ठेवतो जपून

एकच जगामध्ये निर्मोही असे शेतकरी
त्याच्या रोजीरोटीची कर ना व्यवस्था काहीतरी

आभाळा तुझी माया बरसू दे त्याच्यावर
नकोत तेच घाव दरवर्षी त्याच्या मनावर

वेळ असतो कुठे त्याला मनमुक्त जगण्या
सदा तयार तो सुखदुःखाचे समायोजन करण्या

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*

काळ बदलला, स्थिती वेगळी
नवीन वारे वाहू लागले
जुने ते सोने असे न राही
समाजाचे आता रंग वेगळे

नवीन पिढी पुढे धावते
जुनी पिढी का मागे रहावी
समायोजन करूनी आता
पुढे धाव जुन्या पिढीने घ्यावी

विसंवादही सहजी टळेल
नवे,जुने मिटेल अंतर
सुखाचे येतील ही दिवस
नाती बनतील ही कणखर

कटुंब व्यवस्थाही अबाधित
ज्येष्ठजनांचे अनुभवी ज्ञान
नवे,जुने हा मेळ साधूनी
तरुण ज्येष्ठांचा राखती मान

दुनिया झाली मुठीत बंद
नव्या युगाची सारी किमया
आपले परके कुणा न कळे
आभासाशी नाती जोडूनिया

घट्ट होण्या नात्यांची वीण
मना मनात प्रीत जागूदे
विश्वबंधुत्व सार्थ व्हावया
आपुलकीचे बीज रुजू दे

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हाः सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles