
मराठवाड्यातील कला केंद्रातील गैरप्रकारांना सुषमा अंधारे यांचे पाठबळ
_रत्नाकर शिंदे यांना बळीचा बकरा बनवले_
बीड: राज्यभरातील कला केंद्र चालक सुषमा अंधारे यांच्या संपर्कात असतात, आपल्यावर पोलीस कारवाई होऊ नये यासाठी मदत करण्याची गळ घालतात. या ठिकाणी चालणाऱ्या गैर प्रकारांना सुषमा अंधारे यांचे पाठबळ असून या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांचे विभक्त पती तथा शिंदे गट शिवसेनेचे राज्य समन्वयक ऍड वैजिनाथ वाघमारे यांनी केला.
केज येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या भागीदारीत चालवल्या जाणाऱ्या कला केंद्रावर दोन दिवसापूर्वी पोलिसांनी धाड टाकली होती. या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असल्याचे समोर आले होते या पार्श्वभूमीवर अडवोकेट वैजनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी 25 लाख रुपये घेतल्याचे ते म्हणाले. तसेच ‘कला केंद्र तू चालव मी आहे’. पोलीस कारवाई होऊ देत नाही असे म्हणत पाठबळही दिले. यामुळेच रत्नाकर शिंदे हे बळीचा बकरा बोलले असेही वाघमारे यांनी यावेळी म्हटले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुषमा अंधारे यांचे मोठे वजन निर्माण झाले आहे. परंतु कला केंद्राच्या माध्यमातून चालणाऱ्या गैरप्रकारांना पाठबळ देणाऱ्या अशा महिलेची पक्षातून त्यांनी हाकालपट्टी करावी अशी मागणीही वाघमारे यांनी यावेळी केली.