सुख शांती समाधान संस्थेतर्फे गुरुपूजन कार्यक्रम विठ्ठल रुक्माई कोराडी मंदिरात संपन्न

सुख शांती समाधान संस्थेतर्फे गुरुपूजन कार्यक्रम विठ्ठल रुक्माई कोराडी मंदिरात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : सुख, शांती, समाधान संस्था नागपूर तर्फे गुरुपूजनाचा कार्यक्रम रविवारी दि.९ जुलै रोजी सकाळी १० ते १ यावेळेत विठ्ठल रखुमाई मंदीर कोराडी येथे नुकताच संपन्न झाला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू सचिनजी माथुरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांचेच पूजन करून पाय धुऊन त्यांचे औक्षण करण्यात आले व गुरुंचे आगमन १० वा. झाले. फुलांच्या वर्षावत, तुतारीच्या नादात त्यांना मंचापर्यंत नेवून स्थानापन्न केले. संस्थेच्या वर्किंग ग्रुपच्या सेविकांनी स्वागत नृत्य सादर केले.

सर्व उपस्थितांचे स्वागत करुन, गुरुंच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि गायत्री मंत्राचे सर्वांनी पठण केले. जणू सर्वत्र ज्ञानमय प्रकाश पडला गुरु स्थानापन्न झालेत. गुरूंनी गुरु वंदना घेवून गुरुपूजन झाले. पूजा विधी पद्माकरजी गजापुरे यांनी सांगून सुनिलजी आणि मोनाताई पोतदार यांनी गुरुपूजन केले. बापुरावजी पराते यांनी भक्तिगीते गायीले. गुरु तत्वावर मधुकरजी सोनवणे आणि सौ. पल्लवीताई भालेराव यांनी भाष्य केले. त्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रम गिते व नृत्य सादरीकरण करण्यात आले.

गुरुंच्या मार्गदर्शानात संपूर्ण विश्वास युक्त श्रद्धा ठेवावी की गुरु प्राप्ती होते, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आध्यात्मिक विकास करून सत्चित्त ते सचिदानंद पोहोचू शकतो. याप्रसंगी सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. सौ.रंजना कडू हिने सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचे संचालन सौ. वर्षा मेंढे हिने केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन सौ.विद्या रणदिवे हिने केलेत. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. व ओंकार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles