आधार कार्ड शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद

आधार कार्ड शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर व सी.पी.अँण्ड बेरार शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्हि.एन. रेड्डी उपाध्यक्ष यांनी आपल्या अथक प्रयत्नाने चार दिवसीय निःशुल्क आधार शिबिराचे आयोजन सी.पी. अण्ड बेरार शाळेत केले होते.

माजी नगरसेविका सौ. वर्षाताई ठाकरे, यांच्या विशेष विनंती वरून हा आधार शिबिर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्ही एन रेड्डी यांच्याद्वारे घेण्यात आला. ह्या शिबिराला विद्यार्थ्यानी भरघोस प्रतिसाद दिला. निःशुल्क शिबिर असल्यामुळे पालकांना खूप मोठा आधार आणि दिलासा मिळाला. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्ही एन रेड्डी यांचे खूप आभार मानले. या शिबिर करिता राष्ट्रिय मानवधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढि, यांनी आयोजकांचे भरपूर कौतुक केले आणि ते म्हणाले की रेड्डीजीं सारख्या युवा नेत्याने असले स्तुत्य उपक्रम सातत्याने करत राहिले पाहिजे, जेणे करून बाकीची युवापिठी आपल्या कडून प्रेरणा घेऊन काम करतील. मुख्यध्यापक सौ. देशपांडे, उपमुख्यध्यापक रणदई यांनी सुद्धा रेड्डी यांचे आभार मानले आणि भविष्यात सुद्धा असेच उपक्रम आपण मिळून करूया यावर विशेष भर दिला. 150 हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपले आधार निःशुल्क अपडेट करून घेतले, हे विशेष. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या चमूनी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles