
राजकारण
बरेच काही शिकवुन ज्ञानाचे
अमृत पाजणारे कसे वेगळे झाले
सत्तेच्या हव्यासापोटी पाहा इथे
असे कसे नातेही दुर गेले
जिव्हाळा , ममता कुठे दडली
बहीण भावाचे प्रेम ही आटले
ज्यानी शिकविले राजकारण
त्याच्याच पाठीत खंजर खुपसले
दिली गुरूजीनी शिक्षा
त्याच्याच घात केला
शिकताच थोडी विद्या
पक्षच फस्त केला
दुपारचा शपथविधी आणि
महाराष्ट्राच्या सत्यानाश केला
खुर्चीच्या सत्तेत आणीबाणी
चाटी तळवे, नीतिमत्ता विकली
मेळाव्यातून शक्तीपरीक्षा झाली
सहभागाकरीता मुंबई गाठली
अप की शप असे सुरू झाले
ना अप ना शप सर्वच गप झाले
असे हे गलिच्छ राजकारण नको
क्षणात घेते वळसे बघा काय होते
कमलाबाईत प्रवेश करताच
ईडी सीबीआई स्वच्छ धुतले जाते
कुसुमलता दिलीप वाकडे
नागपूर