
समायोजन
काळ बदलला, स्थिती वेगळी
नवीन वारे वाहू लागले
जुने ते सोने असे न राही
समाजाचे आता रंग वेगळे
नवीन पिढी पुढे धावते
जुनी पिढी का मागे रहावी
समायोजन करूनी आता
पुढे धाव जुन्या पिढीने घ्यावी
विसंवादही सहजी टळेल
नवे,जुने मिटेल अंतर
सुखाचे येतील ही दिवस
नाती बनतील ही कणखर
कटुंब व्यवस्थाही अबाधित
ज्येष्ठजनांचे अनुभवी ज्ञान
नवे,जुने हा मेळ साधूनी
तरुण ज्येष्ठांचा राखती मान
दुनिया झाली मुठीत बंद
नव्या युगाची सारी किमया
आपले परके कुणा न कळे
आभासाशी नाती जोडूनिया
घट्ट होण्या नात्यांची वीण
मना मनात प्रीत जागूदे
विश्वबंधुत्व सार्थ व्हावया
आपुलकीचे बीज रुजू दे
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हाः सांगली