दोन उमुख्यमंत्र्यांप्रमाणेच ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतुद करावी.

दोन उमुख्यमंत्र्यांप्रमाणेच ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतुद करावी.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: महाराष्ट्र राज्यातील दोन मुख्यमंत्री निवडीप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये सुद्धा दोन उपसरपंच निवडीची तरतूद करण्यात यावी व त्याबाबतचे अध्यादेश, परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत
अशी मागणी मुख्यमंत्री याच्या कडे संजय मदन आडे तांडा सुधार समिती जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केली आहे .
महाराष्ट्र राज्यात सद्या सरकारने आपल्या सोयीसाठी दोन उपमुख्यमंत्री निवडले असून, तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सर्व ग्रामपंचायत मध्येही दोन उपसरपंच निवडण्याबाबत शासन स्तरावर तात्काळ विचार व्हावा.
तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावातही अनेक गट असतात, त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनेल मधून निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच हे पद मिळावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते. त्यातच सरपंचपद राखीव असले तर इतरांना म्हणजे सर्वसाधारण खुल्या सदस्यांना संधी मिळत नाही. त्यातून अनेक जण नाराज होतात,
सदस्यांची फोडाफोडी होते व काही वेळा सदस्यांची पळवा पळवी देखील होते. काही वेळा यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार देखील होतो. त्यातूनच गाव पातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो. त्यामुळे दोन गटात भांडणे होतात व त्याचे दुष्परिणाम गावच्या विकासावर तर होतातच व गावात देखील राजकिय वातावरण दूषित होते .
त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यां प्रमाणेच दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद केली तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल व सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे ग्रामविकसात योगदान देता येईल. . यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन परिपत्रक काढावे व त्याची अंमलबजावणी करावी अशी नम्र विनंती.

संजय मदन आडे ग्रा.प.सदस्य तथा कार्याध्यक्ष अखिल भारतीय तांडा सुधार समिती यवतमाळ जिल्हा.यांनी मुख्यमंत्री साहेब याच्या कडे एका निवेदन द्वारे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles