
प्रेमाचे नाते
तुझ्यासाठी काय पण
असं तू बोलून गेलास..
सर्व नाती गोती तू
असं कसं विसरुन गेलास..
खरंच असते का हो!
प्रेमात एवढी ताकद..
जन्मदात्यांना दुखवुन
प्रेमावरच देतो दाद..
सर्व नाते प्रेमापुढे तू
नाते फिके पाडत गेलास..
तुझ्यासाठी काय पण
असं तू घडत गेलास..
ऐक मिञा एक सांगते
जन्मदात्याची जाण तू कदर..
तेव्हाच मिळेल तुला
तिचा प्रेम आणि आदर..
प्रतिभा गौपाले , नागपूर