भूगंध

भूगंध



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

निरभ्र आकाशात अचानक
कृष्णवर्णी मेघ जमले
पाहता पाहता सगळेच
वातावरण बदलून गेले

उष्ण झळांनी अंगाची
झाली होती लाहीलाही
मनात झाल्या पल्लवित आशा
वाऱ्याने दिली पावसाची ग्वाही

चातकाची संपली प्रतीक्षा
शामल ढगांची झाली गर्दी
थेंबथेंब लागले बरसायला
विजांची आता लागली वर्दी

मातीतून दरवळत गेला भूगंध
तरु वेलींना देह ओलाचिंब
सुखावला मनाला शीतल वारा
मयूर आनंदाने फुलवतो पिसारा.

अनुराधा भुरे,नांदेड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles