
पावनखिंड
संकट भारी ओळखले राजाने
सामना करण्या सैन्य तोकडे
चालू सर्वजण विशाळगडी
नसे पाठबळ आपुल्याकडे.
घालमेल ही शिवरायांची
बाजीप्रभूच्या आली ध्यानी
स्वराज्य राखण्या जिद्दीने
दिली हाक मनातेन.
अडवितो वाट रोखितो गनिम
राजं तुम्ही व्हावं पुढे
या वक्ताला हेच करावं
विचार दुसरा नको गडे.
नाही पटला सल्ला बाजींचा
राजे बोले स्वराज्यभक्ताला
नाही जाणार सोडुनी तुम्हा
जीवलग आमुच्या काळजाला.
आण घातली स्वराज्याची
रोखितो वाट गनिमांची
नसे वेळ ही सल्लामसलतींची
आगेकूच करावी विशाळगडाची
लाख मेले तरी चालतील
लाखांचा पोशिंदा जगी हवा
बोलले बाजीप्रभू कळवळीने
दिले अलिंगन जीवाभावा.
मावळा होता शिवरायांचा
लढवली जिद्दीने घोडखिंड
आले जरी त्यास वीरमरण
केली अजरामर पावनखिंड.
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=======