समृद्धीचा घास हिसकावून एकता पॅनलच्या असुरी विजयाचा सर्वत्र निषेध.

समृद्धीचा घास हिसकावून एकता पॅनलच्या असुरी विजयाचा सर्वत्र निषेध.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शिक्षकी पेशाला अशोभनीय राजकारण करून, एकता पॅनलनी पुन्हा एकदा फोडाफोडी करून सत्तेसाठी आपण किती हपापलेलो आहो याचा प्रत्यय दिला.. मुळात आपण सर्व शिक्षक कर्मचारी आहो.. आपल्या पेशाला हे शोभणारे नाही पण याची जराशिही न बाळगता पूर्ण स्पष्ट बहुमतातील पॅनलला फोडून…त्यातीलच एक सभासद ओढून..सत्ता स्थापन केली आहे. म्हणून कोणताही लोकशाही मार्गाने चालणारा शिक्षक या विजयाचे समर्थन करणार नाही… जो कौल मतदारांनी दिला त्याचा मान राखून विरोधी बाकावर मोठ्या मानाने , सन्मानाने बसले असते.. तर त्यात त्यांचा खूप मोठेपणा असता… जो त्यांना सत्ता स्थापन करून सुद्धा मिळवता आला नाही… याने त्यांची मान उंचावली तर नाहीच पण शरमेने मात्र निच्छित खाली गेलेली आहे… समृद्धीला यात विजय मिळवून सत्ता स्थापन करण्यात अपयश जरी आले असले तरी स्वाभिमान अस्मितेला कुठेही त्यांनी धक्का पोहोचविलेला नाही, गैरमार्गाचा अवलंब केला नाही.. एखाद्या फुटीरवादी, स्वार्थाने बरबटलेला लालची, लाचारी असेल त्याला कितीही समजावण्याचा डोज पाजले असेल …

शेवटच्या दिवसापर्यंत त्याला समजावण्याचा, नाही तर तुलाच अध्यक्ष पद देण्यापर्यंत सांगितले असेल तरी तो मानायला तयार होत नसेल , किंव्हा एखादा आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा नसेल तर शेवटी पॅनल प्रमुख आणि इतर लोक काय करू शकतात…? घरातील एखाद्याने स्वतःच्या भल्यासाठी घर सोडून जाण्याचा पक्का निर्णय घेतला असेल आणि विरोधकाकडून त्याला घबाड मिळाले असेल आणि बेइमानी त्याच्या नसानसात भरली असेल तर त्याला कोण रोखू शकणार? .पण दुसऱ्याच्या ताटातले कितीही उष्टे तुकडे उचलून खाल्ले तरी भूक भागत नसते… म्हणून अशा या बेइमानी करणाऱ्याला भविष्यात धडा शिकविने व अशा कुटनीतीचे, पळवापळवीचे राजकारण करणाऱ्या एका पॅनलला आपली जागा दाखविणे अगत्याचे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles