गर्दीतला एकटेपणा म्हणजे ‘फ्रिडम’ काय? ;मनिषा सुतार

गर्दीतला एकटेपणा म्हणजे ‘फ्रिडम’ काय?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

समाजात व दैनंदिन जीवनात अचानक घडणाऱ्या घटना व बातम्या ऐकुन आश्चर्याचा धक्का बसतो. एक प्रसिद्ध मराठी नट तीन दिवसांपूर्वी एकटाच मृत्यूशी झुंज देऊन जगाचा निरोप घेतो. पण कोणालाही त्याची खबर नाही. जो चेहरा अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा होता, त्याचा शेवट असा असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. इतकं माणसाचे आयुष्य एकटं झाल आहे. इंटरनेटवर्कच जाळं दाट आहे. दुनिया ऑनलाईन २४ तास connect आहे. पण offline मात्र मनाचं मनाशी असलेल नेटवर्क मात्र कमकुवत होऊन ऐकमेकांपासून disconnect होत चाललो आहोत.

पैसा, प्रसिद्धी, सत्ता, चमकधमक या सर्वापेक्षा समाज, कुंटुब व कुटुंबांतील माणसं, मित्रपरिवार आजूबाजूला प्रत्यक्षात असणं महत्वाचं आहे. आज कित्येक कुटुंबातील माणसं जास्त पैसा कमविण्यासठी आपला देश , आपली माणसं सोडून दूर जातात. एकदा दुर गेली कि, ती मनाने कधी दुर जातात हे त्यांनासुद्धा समजत नाही. कित्येक वयोवृद्ध जोडपे ज्यांची मुल परदेशात गेलीत ते एकाकी जीवन जगतात. सुरुवातीला मुलगा परदेशात आहे अभिमान, कौतुक वाटायचं; पण ते त्यांच्या दुसऱ्या दुनियेत हरवू जातो. ज्या मुलांसाठी आयुष्यभर आई बाबांनी खस्ता खालेल्या असतात, त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ एकाकी होवुन जाते. ‘पालकांनी मुलांना जास्त पैसे कमविण्याची प्रेरणा जरूर द्या’; परंतु इतकी पण नको, कि ती मुले स्वःताच्या कुटुंबाला, आईवडीलांना विसरून जातील.

कित्येक पॅकेज मंडळी जास्त पैसा मिळेल तिकडे संपत्ती जमविण्यासाठी दूर जातात. आतातर अगदी नवीन जोडपे सुद्धा नवरा एकीकडे तर बायको एकीकडे कंपनीच्या कामामुळे एकमेकांपासुन दुर राहतात. त्यांचा संसार म्हणजे weekend ला दोन दिवस एकत्र राहणं. मग काय एक प्लॅट, रो हाऊस, फार्म हाऊस. अनेक द्रव्यरूपी संपत्ती दोघांनी मिळून कमवायची आणि दोघांच्या नात्यातील प्रेमाची, विश्वासाची संपत्ती हळूहळू गमवायची हेच चित्र समाजात दिसू लागलं आहे.कितीही स्त्री कमवणारी असली, तरी जोपर्यंत स्वःता स्वयंपाक बनवुन आपल्या माणसाला चार घास जेवू घालत नाही, तोपर्यंत त्या नात्यातही जिव्हाळा तयार होत नाही. कर्तबगार मुली आहेत मान्य आहे. दोन दोन लाख महिना कमवतात . प्रत्येक कामाला नोकर चाकर ठेवू शकतात. परंतु सत्य हे ही आहे कि, ते दोन लाख त्यांना व कुंटुंबाला खरचं सुख, समाधान देतात का ? आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी दिलेला वेळ , त्यांची मनापासून घेतलेली काळजी यातुनच नाती घट्ट होतात. महागाईच्या काळात जरी दोघांनी कमावणं महत्वाचं असल; तरी गरज लागेल तिथे नात्यांसाठी वेळ देणं, पण एक best investment आहे . पैसा भविष्याची तरतूद म्हणून कमावत असताना भविष्यात नात्याची भावनिक सुरक्षितता महत्वाची आहे.

पती, पत्नी नौकरी करणारे असल्यास, बाळाला सांभाळायला पूर्वी हक्काचे आजी, आजोबा असायचे आता servant, किंवा day care शिवाय पर्याय नाही. आजची छोटी मुले, आजी आजोबांच्या निखळ प्रेमाला पारखी होत चाललेत . बालमनावर मायेचे उबदार संस्कार देणारे वडीलधारी घरात नाहीत. पूर्वी ऐकमेंकाचं पटो अथवा न पटो पण एकत्र राहायची. पण आता freedom हवा त्यामुळे त्यांची छोटी मुलं एकाकी पडतात हे सर्व पाहून वाटतं, नेमकी प्रगती कशाची झाली. ना मुलांना देवादिकाचे संस्कार, ना राम कृष्णाच्या गोष्टी , एक दोन वर्षाची मुल सुद्धा मोबाईलच्या आहारी गेलेली दिसतात . त्या मुलांची मॉडर्न मॉम बाळ मोठा व्हावा म्हणून, ‘चिकनी चोपडी’ इंग्लिश बोलते. पण त्याला संध्याकाळी देवापुढे दिवा लावून श्लोक शिकविण्यासाठी तिच्याकडे वेळ नाही, हे दुर्दैव आहे.

‘आई’ या शब्दाची ‘मम्मा’ झाली. बाबा या शब्दाचा ‘डॅडा’ झाला. बाई हा शब्द म्हणजे बाप मधील ‘बा’ आणि आईमधील ‘ई’ मिळून तयार झालेला. ‘ बाई पण किती भारी’ आहे . पण बाईपण भारीमधील पैसे कमविण्याच्या नादात स्त्रिया खरं बाईपण , आईपण विसरून कुटुंबाची, संसारची भावनिक वीण सुटत चालली आहे, म्हणून कुठेतरी स्वःताला मर्यादा घालून संसाराला पैशाने समृद्ध करणं जितक महत्वाचं तितकचं संस्काराने समृद्ध करणे, म्हणजे खऱ्या अर्थाने अवघाची संसार सुखाचा करीन. याचं पॅकेज आयुष्यात मिळतयं अस म्हणता येईल..!!

मनिषा सुतार, पिंपरी चिंचवड
जिल्हा पुणे
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles