सोशल मिडिया व तरूणाई; वसुधा नाईक

सोशल मिडिया व तरूणाई



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लहान थोर सारेजण
वेड लागले इंटरनेटचे
अंगठे फिरतात भराभर
ज्ञान मिळते चोहिकडचे…

आजकालची तरूण पिढी काय किंवा लहान मुले काय, आपण काय ? सारी सारखीच, सर्वांच्या हातात एक खेळणे असते. त्याचे नाव मोबाईल. यावर सर्व जगाचे ज्ञान अवगत होते.
किबोर्डवर बोटे फिरताच
ज्ञानाचे भांडार खुले होते
यू ट्युब वर सर्च करताच
जे हवे ते मिळून जाते..
नवनवीन अॅप प्लेस्टोअर मधून डाऊनलोड केले की शैक्षणिक माहिती,सामाजिक माहिती,बौद्धिक खुराक,कविता इत्यादीचे ज्ञान मिळते.पूर्ण जगात काय चाललेय हे समजते. अचूक ज्ञान मिळते.

बातम्या आपण आत्तापर्यंत वर्तमानपत्रात वाचत होतो.आज वर्तमानपत्रच डिजिटल झालेय .याचा लाभ ही पिढी करून घेते.नोकरीमुळे या मुलांना घरी वेळ मिळत नाही बारा बारा तास नोकरीच्या ठिकाणी असतात.अशा वेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होतो. पण हीच तरूणाई जर तंत्रज्ञानाच्या वाईट नादाला लागली तर आख्खी पिढी बरबाद होताना दिसते. काही सेक्सचे व्हिव्डिओ पाहून तरूणाई चलबिचल होतेय.यातूनच बलात्कारासारख्या अत्यंत घृणास्पद काम तरूणाईकडून होताना दिसते.

तसेच मुलींची फॅशन या चित्रपटांच्या व्हिडिओमुळे बळावली आहे .त्यातूनच ही पिढी जरा बिनधास्त वागतेय.पण हे सर्व हानिकारक होतेय. हल्ली व्हाॅटसॅपच्या या सोशल मिडियामुळे अनेक चांगल्या बाबी होतानाही दिसतात.अनेक चांगले समूह असतात .अॅडमिन छान काळजी घेतात समूहाची. सोशल मिडिया छान आहे त्याचा योग्य वापर केला तर आजची तरूणाई गगनभरारी नक्कीच घेईल.

अपडेटेड माहितीमुळे तो सदैव अपडेट राहतोय,सर्व सुविधांचा उपयोग घेतोय. काही ठिकाणी याचा अतीवापर केल्याने या भौतिक सुखांची सवय होतेय.माणूस प्रगती तर करतोय पण अती वापरामुळे त्याची अधोगती होऊ नये ही इच्छा! या सुविधांचा वापर योग्य करा तरूणांनो….आणि जीवनाचा आनंद उपभोगा….आपले आरोग्य सांभाळा…!!

वसुधा नाईक,पुणे
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles