पर्यावरण रक्षण

पर्यावरण रक्षण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुदमरला श्वास,धरतीचा
मेटाकुटीस जीव आला,
जंगले तोडली स्वार्थापाई
म्हणून,ओझोनचा थर कमी झाला.

नाते,वृक्षराजाचे आहे,
साऱ्या नात्याहुनी श्रेष्ठ,
दुजाभाव न, ठावे त्यास
असो कोणी,श्रेष्ठ वां कनिष्ठ.

विशाल अंतःकरण निसर्गाचे
सर्वांवार, समान माया करतो,
दमल्या,भागल्या वाटसरूनां
तप्त उन्हात शीतल छाया देतो.

निसर्गाचा समतोल सांभाळू
पर्यावरणाचे रक्षण करू,
वृक्षारोपण जागोजागी करून
लावलेल्या,झाडांचें संवर्धन करू.

जन्मापासून ते, मृत्यूपर्यंत
साथ, मानवांची तो सोडत नाही,
सगेसोयरे उरकतात अंत्यविधी
मात्र तो,शेवटपर्यंत सोबत राही.

नका करू, कोणी,कत्तल झाडांची
वृक्षारोपण करुया स्वतः साठी,
दुर्मिळ झाला जगण्याचा प्राणवायू
संवर्धन करू,जग कल्याणासाठी.

हिम्मत त्याची पाहून घ्यावी
करावे आत्मचिंतन मनात,
जरी तोडले, मुळासकट
तरी नव्याने अंकुरीत होतात.

लोकसंख्या वाढअफाट झाली
जंगलाच्या जागेवर वस्ती आली,
आपल्या वैयक्तिक सुखासाठी
जंगलांची मात्र, होळी केली.

जंगले वाचले तर,मानव जगेल
हाक धरनीमातेची ऐकून घेऊ,
गरीब श्रीमंत मतभेद विसरूनी
राहू,आनंदाने आम्ही बहीण भाऊ.

मायादेवी गायकवाड
ता.मानवत, जि.परभणी
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles