
सखे शेजारीनी
सखे शेजारीनी
काय ग तुला लळा
चार चौघी करून गोळा,
बोलसी तू भळा-भळा।
हातभर काकडी नऊ हात बी
अशी कशी ग तुझी लबाडी
बाया बापड्या गोळा करून
बोलत बसतेस भलते वेळी।
नेहमी दाखवून दुसऱ्याच्या चुका
सदैव तू हासशी लोका
दुसऱ्यांनी तुझच ऐकावं
असा का ग तुझा असतो हेका।
स्वतःच ठेवतेस झाकून
दुसऱ्याच पहातेस वाकून
दुसऱ्यासोबत बोलताना
ठेवतेस हातचं राखून
प्रत्त्येक जण तुझ्यासारखं
नाही वागू शकत
घर उधळून मांडव
नाही टाकू शकत।
दुसऱ्याला बोलताना
लक्ष दे स्वतःकडे
एक बोट दाखवशील दुसरीकडे
उरलेली चार असतील तुझ्याकडे
आपण हासे लोकाला, शेम्भूळ आपुल्या नाकाला
असं कधी होऊ देऊ नको
आपल्याच घराची वाताहत
आपल्या हाताने होऊ देऊ नको
दुसऱ्यांशी तुलना करणे सोडून दे जरा
जगी सर्व सुखी कोण आहे पहा जरा।
शशी मदनकर
ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर
========