
हरवलेली पाखरे
मन मोकळे मोकळे
त्याला आभाळाचे वेड
स्वप्न वैभवाची ओढ
धावे क्षितीजापल्याडं
उंच चालली चालली
गिरीकड्यांची स्पंदन
आला तिमिर दाटून
सुटले वादळ भयान
अकल्पित सावटाने
स्तब्धला हास्य कल्लोळ
रंग विखुरण्याआधी
झाला आशेचा मावळ…
अल्लड अवखळ मन
किती निरागस निष्पाप
सोडून संस्काराची वाट
कशी पडलीया झाप…
उद्याचे सोनेरी भविष्य
त्याला देऊया आकार
उद्गामी किल्मिषांना
घालू वेळीच आवर
अंगिकारू सुयोग्य वर्तन
स्तोम जातील दुखरे
नवचैतन्यासवे घरट्यात
परततील हरवलेली पाखरे
परततील हरवलेली पाखरे
आशा गेडाम
वणी जि. यवतमाळ
=======