प्रेम किनारा

प्रेम किनारापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जशी दुथळी वाहते
प्रेमाने भरुन प्रेमनदी ,
तसा प्रेमप्रवाह बघतोय
मी तुझ्याच ह्रदयामधी..!

स्वछंद तुझा प्रेमप्रवाह ,
तू वाहती धारा निर्झर
किती भेटले असतील..
तुलाही त्या किना-यावर

कामी क्रोधी प्रेमलोभी ,
भेटले सगळे तिरावर
तू वाहतच गेली पुढे..,
ना घेतलीस ते मनावर

मीही त्यापैकीच एक..
असे वाटले असेल तुला ,
मला न कळले अजूनही
का दुरावलीस मजला ?

प्रवाह असतो अटळ..,
अजूनही तो दूर सागर
तुला न थांबने झाले ,
मला सोडली अर्ध्यावर

संभाव्य तुझा एक जणू..,
तो “प्रेम”..वाहती जलधारा
जो भाग्यवान त्रुप्त झाला
मी कोरडाच प्रेम किनारा !

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
जि गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles