मनीष नगर अंडरपास होत असलेल्या ट्राफिकमुळे नागरिक त्रस्त

मनीष नगर अंडरपास होत असलेल्या ट्राफिकमुळे नागरिक त्रस्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे धंतोली झोन अधिकाऱ्यांना दिले निवेदन.

नागपूर: दक्षिण पश्चिम मतदारसंघ नागपूर मनसेच्या वतीने आज मंगळवारी 18 जुलै रोजी सकाळी 10:30 वा. धंतोली झोन महानगरपालिका कार्यालयात शहराध्यक्ष चंदूभाऊ लाडे, विशालभाऊ बडगे यांच्या मार्गदर्शनात व शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या नेतृत्वात मनीषनगर अंडरपास येथे होत असलेल्या “ट्रॅफिक जाम” मुळे नागरिकांमध्ये भारी असंतोष व राग आहे व त्यामुळे नागरिकांनी व रहिवाशांनी महाराष्ट्र निर्माण सेनेकडे आपला प्रश्न मांडल्यामुळे उपशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी ताबडतोब आपल्या काही पदाधिकाऱ्यांना सोबत महानगरपालिका कार्यालयात धंतोली झोनमधील वरिष्ठ अधिकारी धनविजय साहेबांना निवेदन सोपविले व परत यावर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, या विषयावर आमच्या सतत मीटिंग चालू आहे व मेट्रो ने अजून पर्यंत आम्हाला हॅन्ड ओवर केलेले नसल्यामुळे आम्ही तिथे काहीही करू शकत नाही. असे उत्तर झोन अधिकारी धनविजय यांनी दिले.

यापूर्वी भुयारी मार्गात कॅमेरे बंद व लाईटची व्यवस्थाही नाही यासंदर्भात मेट्रोचे अधिकारी अखिलेश हळवे साहेबांना पण निवेदन दिले होते. ते म्हणतात आम्ही कार्पोरेशनला हॅन्ड वर केलं. आणि झोन चे अधिकारी म्हणतात आम्हाला केलं नाही असा तो प्रश्न निर्माण झालेला आहे ? यावर काय तोडगा निघेल किंवा नाही निघेल, याकरिता मनसे सैनिक रस्त्यावर उतरतील आणि नागरिकांना न्याय देतील.

शेवटी प्रश्न असा उभा होतो की, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न व जबाबदारी अखेर कुणाची?

यासंदर्भात मनसे सैनिकांनी निवेदन दिले परंतु हल निघाले नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो ? त्या रोडवरील नेहमीच अपघात होतात, अजूनही अपघात होण्याची शक्यता आहे. वाहतूकदार व तेथील नागरिक त्रासून गेले आहे. म्हणूनच मनसे सैनिक पाऊल उचलत आहे.

वस्तीतील रहिवासी, तेथील नागरिक, मनसे सैनिक, नागरिकांच्या हक्कासाठी, सुरक्षेतेसाठी, आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील असा इशारा तुषार गिऱ्हे यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी मनसे सैनिकांमध्ये उपस्थितीत विभाग उपाध्यक्ष विनीत तांबेकर, चेतन बोरकुटे, चेतन शिराळकर, सौ.संगीताताई सोनटक्के, प्रिया बोरकुटे व हर्षद दसरे यावेळी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles