
नागपुरात कार चोरट्यास अटक
नागपूर: कार भाड्याने नेत परत न देता दुसऱ्याला विकणाऱ्या महाभाग चोरट्यास जरीपटका पोलिसांनी 13 महागड्या कार सोबत अटक केली आहे. प्रखर शिशूर तिवारी असं या महाभाग चोरट्याचं नाव आहे.
नागपूर सौरभ मनोज दरेकर यांचा कार किरायाने देण्याचा व्यवसाय आहे.. प्रखर तिवारी हा कार भाड्याने नेत.. सुरुवातीला काही दिवस त्यांनी कार परत आणून देत विश्वास संपादन केला.
मात्र त्यानंतर तो कारचे भाडेही देत नसत…तसेच कारही परत करायला टाळाटाळ करू लागला… त्यामुळे दरेकर यांना फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी जरीपटका पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनीही संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असता…पोलिसानी खाक्या दाखवल्यानंतर त्या कार दुसऱ्यांना परस्पर विकून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली… पोलिसांनी आतापर्यंत 13 कार जप्त केल्या आहेत. प्रखर तिवारी याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता असून तपास जरीपटका पोलीस करत आहेय.