जे एस एम कॉलेज येथे “राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण “कार्यक्रम संपन्न

जे एस एम कॉलेज येथे “राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण “कार्यक्रम संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

अलिबाग: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि महिला विकास कक्ष जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जे.एस.एम. कॉलेज अलिबाग येथे दोन दिवसीय “राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण “प्रशिक्षण शिबीराचे १७ जुलै आणि १८ जुलै २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते.
शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण झालेल्या समस्या व त्यामुळे वाढत्या प्रमाणात महिला व युवतींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने तरुणींचे मनोबल वाढविण्यासाठी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला निर्मला कुचिक जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती निर्मला कुचिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलींना स्वसंरक्षणाची शिक्षणाची गरज आहेच परंतु त्याबरोबरच प्रत्येक मुलीने आरोग्यदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शिका अश्विनी गाडगीळ‌ यांनी फेसबुक , व्हाट्सअप,इन्स्ट्राग्राम इत्यादी सारख्या सोशल मीडियाचा वापर करताना कोणती सावधगिरी बाळगावी यावर मार्गदर्शन केले.प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या . दुसऱ्या दिवशी श्री. तुषार घरत यांनी सायबर क्राईम याविषयीची माहिती मुलींना दिली आणि मुलींनी कशी सतर्कता बाळगावी यावर मार्गदर्शन केले.

त्यानंतर कराटे प्रशिक्षक प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने अचानक हल्ला झाला तर स्वतः ची सुटका करून घेण्यासाठी प्राथमिक स्तरावर कशाप्रकारे आपला बचाव केला पाहिजे याची माहिती दिली व वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मुलींना प्रशिक्षण दिले.

यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी गितांजली पाटील, विस्तार अधिकारी अपर्णा शिंदे, जे.एस.एम.कॉलेज प्राध्यापिका महिला विकास कक्ष प्रमुख गौरी लोणकर, आयसिडीएस पर्यवेक्षिका उल्का कुलकर्णी, सामिया परेकर, विनोदिनी मोकल, सेविका ॲड. जिविता पाटील, कराटे प्रशिक्षक प्रशांत इंगळे, सुजाता इंगळे, यश पालवणकर, प्रल्हाद घरत तसेच जे.एस.एम कॉलेज समस्त प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यावेळी १५० हुन अधिक मुलींनी सदरील प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

सदर कार्यक्रमास जिल्हा व महिला बालविकास अधिकारी विनित म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या तर प्रा.डॉ.जयश्री पाटील, प्रा. नम्रता पाटील, प्रा.श्वेता मोकल, प्रा. श्रावणी मगर, प्रा.अश्विनी आठवले, प्रा. सुरभी वाणी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. गौरी लोणकर यांनी केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांनी सुत्रसंचलन केले. प्रा. शिल्पा कवळे यांनी आभार प्रदर्शन करताना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.मा. श्री. गौतम पाटील आणि प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल विशेष आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles