
रायगडातील पेण मध्ये गणपती बाप्पा बुडाले पाण्यात
_अतिवृष्टीच्या कचाट्यात पेणचे गणेश मूर्तिकार_
रायगड: जिल्ह्यात सलग दोन दिवस ढगफुटी प्रमाणे पाऊस कोसळतोय. जिल्ह्यात सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती उदभवलीय. जगप्रसिद्ध असलेल्या पेणच्या सुबक व रेखीव गणेशमूर्ती कारखान्यांना पाण्याने वेढा दिलाय. अचानक पुराचे पाणी वाढल्याने कारखान्यात गणेशमूर्ती पाण्यात बुडाल्या आहेत.
गणेशमूर्तीकार व व्यापारी वर्गाची गणेशमूर्ती सुरक्षित ठिकाणी नेण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल भिजून व वाहून जात आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तीचे नुकसान होणार असल्याने मूर्तिकार महागाईच्या काळात अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडलाय.