
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मन जपताना*
मन जपताना कुणाचं
स्वार्थ बाजूला ठेवावा
दुसऱ्याच्या आनंदात
आपला आनंद पहावा
*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🤎💛♾️♾️♾️♾️
*मन जपताना*
भावनांचा विचार करा थोडा
मन जपताना घालू नका घाला
दुसऱ्याची भावभावना जपा
यातना होतील आपल्या हृदयाला
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🤎💛♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*मन जपताना*
मन जपताना घ्यावी
काळजी प्रत्येकाने..,
सर्वश्रेष्ठ प्रेम असावे
जगाला दाखवून द्यावे
*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️🩷🤎💛♾️♾️♾️♾️
*मन जपतांना*
एकाचे *मन जपताना*
दुसऱ्याचे दुखावणार नाही हे बघा
अशाप्रकारे वागताना
सर्वांच्या मनांत निर्माण कराल जागा
*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
*अंबरनाथ जि. ठाणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🩷🤎💛♾️♾️♾️♾️
*मन जपताना*
मन जपताना स्वतःचे
स्वतःच स्वतःशी बोलते
दुःख अंतराचे अंतराला
हळूच गुज सांगते
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🤎💛♾️♾️♾️♾️
*मन जपतांना*
रंगबिरंगी फुलांचे मन जपतांना
कोमल फुलपाखरु उडे अलगद
तयाठायी नाही संताप क्रोध
चांगले ज्ञान करावे अवगत
*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🤎💛♾️♾️♾️♾️
*मन जपताना*
एकमेकांची मनं जपताना
शब्दांतून मायेची साय व्हावं….
संवाद साधता साधताच
एकमेकांच्या हृदयात विरघळून जावं…
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*