
काँग्रेसच्या प्रदेश सचिवांनी काढली 12 किलोमीटरची पदयात्रा
_आर्वी तळेगाव रस्त्याचे काम 4 वर्षांपासून रखडलेले असल्याने पदयात्रा_
_अमर काळे रस्त्यासाठी आक्रमक; नागरिकांचाही मोठा सहभाग_
वर्धा: जिल्ह्यातील आर्वी तळेगाव या महामार्गाचे गेल्या चार वर्षापासून काम रखडले असल्याने या ठिकाणाहून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अपघात होऊन काहींना जीवही गमावे लागले आहे.
वारंवार सांगूनही रस्त्याचे काम पूर्णत्वात जात नसल्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमर काळे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, आज त्यांनी तळेगाव ते आर्वी या बारा किलोमीटर रस्त्यावरून तब्बल आपल्या शेकडो समर्थकांसह पदयात्रा काढली व या पदयात्रेमध्ये सत्ताधारी पक्षाचा धिक्कार असो सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जोरदार घोषणामध्ये सुद्धा करण्यात आली किलोमीटर जात असलेल्या पद यात्रेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता.