म्हसळा तालुक्यातील दरडग्रस्त गावांना प्रशासनाकडून हाय अलर्ट

म्हसळा तालुक्यातील दरडग्रस्त गावांना प्रशासनाकडून हाय अलर्ट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_दरडग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना_

_तहसीलदार समीर घारे दरडग्रस्त गावांच्या भेटीला_

_गावकऱ्यांकडून प्रशासनाला जागा उपलब्ध करून देण्यास विनंती_

कोंकणात सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थती निर्माण झाली असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत अशातच काही भागात दरड कोसळण्याचे प्रकार निदर्शनात येत असून म्हसळा तालुक्यातील देखील काही दरदग्रस्त गावांना प्रशासनाकडून हाई अलर्ट करण्यात आले आहे तालुक्यातील मौजे- वावे, मारियामखार, महंमद खनिखार, लिपणी,आमशेत या दरडग्रस्त गावांना तहसीलदार समीर घारे यांनी काल भेट दिली यावेळी या गावांना इतर सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या नुकताच खालापूर येथील इर्शाल वाडी वर दरड कोसळून या ढिगाऱ्याखाली 200 हुन अधिक नागरिक अडकल्याची दुर्घटना समोर येताच प्रशासन आता खडबडून जाग झालं आहे.

त्यामुळे दरदग्रस्त गावांना आता तातडीने इतर ठिकाणी हलविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे ,म्हसळा तालुका हा अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग असून या भागात अनेक गावे ही डोंगराच्या पायथ्याशी असून कोणतीही दुर्घटना होऊ शकते यामुळे खबरदारी म्हणून या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles