पुसद शहरात युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

पुसद शहरात युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्यापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_हत्याकांडाची मालिका सुरूच_

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: शहरात खुनाचे सत्र सलग सुरू आहे. पुसद नागपूर रोडलगत असलेल्या विठाळा वॉर्ड येथे बुधवारी रात्री काका पुतण्याच्या हत्याकांडाने पुसद शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच आता पुन्हा एका २३ वर्षीय नवयुवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सलग होत असलेल्या खूनांच्या या मालिकेमुळे संपूर्ण शहरासह जिल्हा ही हादरला आहे.

संघदीप संजय भगत वय २३ वर्ष राहणार धम्म नगर पुसद असे मृतक नवयुवकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार संघदीप हा मनोज सवंगडे हत्याकांडातील आरोपी होता. त्या हत्याकांडाच्या कारणावरून संघदीपची हत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.

गुरुवारी दिनांक 20 जुलै २०२३ रोजी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान संघदीप आणि त्याचा मित्र हे गुणवंतराव शाळेजवळील बजरंग नगर कवड्डीपूर येथील पाणीच्या टाकीमागे बर्थडेचा केप कापत असताना दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी वाद घातला आणि नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी संघदीपच्या डोक्यावर दगडाने वार करण्यात आले. संघदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तर त्याचा मित्र जखमी झाला.

खुनाच्या घटनेनंतर पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर हें घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.सतत घडणाऱ्या खुण, हत्याकांड मालिकेमुळे पोलीस यंत्रने पुढे गुन्हेगारी जगताचे नवीन आव्हान निर्माण झाले आहे.

यावर पोलीस यंत्रणा कसे अंकुश ठेवणार की घटनेमध्ये वाढ होणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. फिर्यादी बाळू आनंदा भगत वय ४२ वर्ष रा. धम्म नगर श्रीरामपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रवीण सूर्यवंशी वय २२ वर्ष, भूषण जोगदंडे वय २० वर्ष, आशिष सूर्यवंशी वय २१ वर्ष, वैभव टेंबरे वय २२ वर्ष,रोहन जोगदंडे वय २० वर्ष सर्व रा. भीम नगर पुसद यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे कलम ३०२, १४३,१४७,१४८,१४९,३२३ भादविनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles