
*”तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू”*
_*मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ करणारे भयाण वास्तव*_
इकडे पंतप्रधान मोदी 38 राजकीय पक्षांना दिल्लीत गोळा करुन 2024 निवडणुकीत स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे मणिपूरमध्ये कुकी समाजातील अनेक महिलांची नग्न करुन धिंड काढली जात आहे. अनेकजण रस्त्यातच त्या महिलांचा विनयभंग करत आहेत, व नंतर शेतात ओढत नेऊन त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. त्यातील एका एकवीस वर्षीय तरुणाच्या लहान भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील सदस्यांनी त्याच्या समोर त्याचा बहिणीवर बलात्कार केला व त्याची निर्घृण हत्या केली.
वरकरणी हा कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमधील वाद असल्याचे दिसत असला तरी भाजप सत्तेत आल्यापासून उग्रवादी संघटनेनी पसरवलेला जातीय द्वेष हे या मागचे प्रमुख कारण आहे. कित्येक दशके एकत्र राहणारे हे समुदाय आता अचानक एकमेकांच्या जीवावर का उठले?
2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे राम माधव आणि हेमंत बिसवा शर्मा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट या उग्रवादी संघटनेची मदत घेतली होती असे आता उघड झाले आहे. त्यांना करोडो रुपयांची आर्थिक रसद पुरवून भाजपने निवडणुकित दहशत पसरवून मतदान हातात घेतले व निवडणुका एकतर्फी जिंकल्या. या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या सहा उमेदवारांची मतदान पूर्वीच हत्या झाली होती. त्यानंतर 2019 ची लोकसभा निवडणूक व 2022 ची मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपने याच उग्रवादी संघटनेशी हातमिळवणी करुन विरोधी पक्षातील सर्व सक्षम उमेदवार भाजपमध्ये खेचून घेतले व सत्ता प्रस्थापित केली.
आता युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट या उग्रवादी संघटनेत फूट पडली व या संघटनेचा प्रमुख एस. एस. हायकोप याने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मैतेई समुदायावर निर्बंध लावण्याची मागणी केली. या पत्रात त्याने त्याच्या उग्रवादी संघटनेने निवडणुकीत भाजपला केलेल्या मदतीचा उल्लेख केला व राम माधव व हेमंत बिस्वा शर्मा यांच्यासोबत मैतेई समुदायावर निर्बंध लावण्याचा करार झाला होता असेही सांगितले. हे पत्र आणि भाजपने उग्रवादी संघटनेशी केलेला करार उघड होताच मैतेई समुदायाचे लोक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले व भाजप सरकार विरुध्द निदर्शने करु लागले. संपूर्ण मणीपुर मध्ये सुरू झालेली ही उग्र निदर्शने थांबवण्यासाठी तेथील भाजप सरकारचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी पुन्हा युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट या उग्रवादी संघटनेची मदत घेतली. या संघटनेतील कुकी उग्रवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांना अक्षरशः घरातून ओढून जिवंत जाळायला सुरू केले. भयग्रस्त मैतेई समाजातील लोक घरदार सोडून पळून जाऊ लागले. आतापर्यंत या समाजातील 300 हुन अधिक लोकांची हत्या झाली आहे, 1700 घरे उध्वस्त केली असून 35000 लोक घरदार सोडून पळून गेले आहेत. मैतेई समाजातील अनेक महिलांवर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. ही उग्रवादी संघटना इतकी हिंस्त्र झाली आहे की आता भाजप सरकार सुद्धा या संघटनेतील उग्रवाद्यांवर नियंत्रण आणण्यात असफल झाले आहे. राज्यातील परिस्थिती भाजप सरकारच्या हाताबाहेर गेली आहे. या उग्रवादी संघटनेने भाजपला अनेक निवडणुका हायजॅक करण्यासाठी मदत केली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर बाबत मौन बाळगून आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी दौरा केल्यानंतर काही दिवस हिंसाचार थांबला पण आता पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. 8 मे पासून मणिपूर राज्यात सुरू झालेले हिंसाचाराचे सत्र आज सुद्धा सुरूच आहे. आता तर मैतेई समाजातील महिलांना नग्न करुन रस्त्यावर धिंड काढली जात आहे व त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर काही विकृत लोक आपल्या वासनेची आग विझवून घेत आहेत.
भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात देशातील एका राज्यात दोन महिने अशा प्रकारचा हिंसाचार आणि अत्याचार सुरु असणे ही लाजिरवाणी बाब आहे. 1972 साली स्थापन झालेल्या या राज्यात अनेक उग्रवादी संघटना कार्यरत असल्यातरी बहुसंख्य लोक शांततेने नांदत होती. या राज्याला दृष्ट लागली. गेली दोन महिने मणिपूर मध्ये हिंसाचार, जाळपोळ, बलात्कार व हत्यांचे सत्र सुरूच आहे. लाखों लोक राज्य सोडून पळून गेले आहेत. मणिपूर धगधगत आहे… आणि सत्तेत येण्यासाठी उग्रवादी संघटनेची मदत घेऊन लाचार झालेले भाजप सरकार हतबल होऊन बघत बसले आहे.
– प्रद्युम्न झा