रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाला रिक्त पदांचा विळखा

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाला रिक्त पदांचा विळखा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उपचारासाठी खासगी अथवा मुंबईला जाण्याची वेळ_

रायगड:शहरातील जीर्ण झालेली इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य, पार्कींगचा अभाव अशा अनेक
समस्यांनी ग्रस्त असलेल्या रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष डॉक्टर नसल्याचा फटका रुग्णांच्या सेवेवर होत आहे. त्यात पूर्णवेळ परिचारिकांचा अभाव निर्माण झाला आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सांपासून विशेष डॉक्टर व परिचारिकांची 78 पदे भरण्यास प्रशासन उदासीन ठरला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय 1980-1981 या कालावधीत उभारले. तीन मजली असलेल्या इमारतीमध्ये 250 खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दर दिवशी सुमारे 800 पेक्षा अधिक रुग्ण बाह्य रुग्ण कक्षामध्ये उपचारासाठी येतात.

पोलादपूरच्या टोकापासून पनवेल, उरण अशा अनेक तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. चांगली सेवा मिळेल या आशेने येणाऱ्या रुग्णांची रुग्णालयात आल्यावर घोर निराशा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तज्ञ डॉक्टर नसल्याचे सांगून तेथील कर्मचारी अधिक उपचारासाठी खासगी अथवा मुंबईमधील दवाखान्यात पाठवितात. या प्रकारामुळे सर्वसामान्य रुग्णांची अनेकवेळा परवड होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles