
भाव मनीचा
भाव मनीचा कळला का?
दुःखान कधी हळहळला का ?
होता अहमपणा तुझ्यात इतका
पाहण्या एकदा तू वळला का ?॥
दिलेस का तू प्रेम कुणाला
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या अंतरंगातला
सांगना का अबोल झाला ॥
प्रिये मी भावगीत गातो
गातांना दाटुन कंठ येतो
सहिष्णू भावनिक आहे
शब्दाला पान्हा फुटतो ॥
भावनेच्या भरात रागावले
जोरात हेकसून नाकारले
अघटित घडून गेल सख्या
अविश्वासाने आरोप आकारले ॥
पारखून स्वभाव माणसांचे
समजस करा करार मैत्रीचे
तळ देवुनी कानोसा घे जरा
संबंध ठेवण्यायोग्य आहे की
नाही खात्रीचे ॥
पवन सु.किन्हेकर, वर्धा
======