
पालवी
पैलतीरी ऐकली साद सुरंगी
आठवली बासरीची ती मल्हारधुन
मनपटलावर छान मोर नाचती
माझी मला कळताच खुण
आभाळ मोकळे हसले अनावर
काया चिंब माळरान न्हाले
पालवी अंकुरता हरीत सोनेरी
मन बेधुंद हर्षित झाले
मुखकमलाचे भाव होता अधीर
नयन मदनी बसले खुशीत
गर्द सावली म्हणता अंगाई
नीज लपली स्वप्नाच्या कुशीत
इवले पाऊल येता अलगद
सुखे ओंजळीत स्नेहीत जीवन
पालवी पल्लवित नटता लोभस
धुंद दिशा गातसे पवन
पालवी पल्लवित नटता लोभस
धुंद दिशा गातसे पवन
उर्मी( हेमश्री) घरत, पालघर
======