
कधी ओसरणार ?
ज्या पाऊसाची आतूरतेने वाट बघतोय
तो पाऊस आता नकोसा झालाय हाय
जिकडे तिकडे पाणीच पाणी
तरी थांबायचं नाव घेतच नाय
त्या इर्शाळवाळीतील जनतेने
कोणता गुन्हा केला हाय
उद्याची स्वप्न रंगवत असतांना
दरड कोसळूनी गाव गिळंकृत केलं माय
साराचा सारा गावच
मातीच्या ढिगा-याखाली दबला हाय
नवरा,मुलं,बहिण,भाऊ, साठी
ढसाढसा रडते माझी आय
गोठ्यातील वासरासाठी
हंबरडा फोडते गाय
द्या हो मदतीचा हात
आर्त किंकाळी मारते माझी माय
करोडो खर्च करून तू सरकार
नुकताच चंद्रयान पाठवल हाय
गावाच्या उद्धारास इतूसाबी
पैसाअडका तू दिलास बघा न्हाय
मंदिर बांधायला तुझी धडपड
पण माणुसकी बांधायची इसरला हाय
अरे थोडी तरी लाज राख
संकटात आधी धावून माझा मावळा आला हाय
जीव धोक्यात तरी दिवस रात्र एक करून
माणुसकीच्या नात्याने पाठीशी उभा राहिला हाय
किव नाही का आमची मृत्यूचे थर आणखी किती रचणार हाय
तू रे पावसा कधी ओसरणार? याचीच वाट सारे बघत हाय
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया