
मोरगावात ‘मेरी माटी-मेरा देश’ उपक्रम संपन्न
अर्जुनी/मोर: ‘आझादी का अमृत -महोत्सव’ यानिमित्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव व ग्राम पंचायत कार्यालय मोरगाव यांचे संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी-मेरा देश’ या उपक्रमातंर्गत गावातून ढोल-ताशांच्या गजरात प्रभातफेरी काढून ,उपक्रम प्रभावीपणे संपन्न झाला.
शौर्याचे प्रतीक स्तंभ व अमृत वाटिका निर्माण करण्यासाठी अमृत कलश यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण करून, राष्ट्रीय एकता-एकात्मतेचा संदेश देऊन, जनतेचे लक्ष वेधले.
याप्रसंगी सरपंच गीताबाई नेवारे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रमेश लाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुनेश्वर शहारे, ग्रामपंचयात सदस्य विद्याताई शहारे, मुरारी उईके, पद्मिना चाचेरे,माधुरी सिंगनजुडे,देवानंद शहारे, मंदा शहारे,प्रमिला शहारे,मुख्याध्यापक रेखा गोंडाने व शिक्षक वृंद , ग्रामसेवक बागळे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी लोकेश वाढई, अरुण ढवळे व मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले.