टपोर चंद्र;प्रतिभा गौपाले नागपूर

टपोर चंद्र



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आज टपोर चंद्र
आकाशात दिसत होता..
मी बघताच का माहीती
ढगाआड लपत होता…
उदासलं मन, गेले थोडं क्षण
विचारलेच मी त्याला
का लपतो ढगामागे की,
घाबरतोस रे मला.

चंद्र हसला, मला म्हणाला
मी तुला घाबरत नाही
तर थोडी जलन होते..
सोबत तुझा सखा बघून
थोडं मनही रडते..
तुझा सखा म्हणजे,
तुझी काळजी घेणारा
मनसोक्त प्रेम करणारा
रडुन हसवणारा
माझीही होती चांदणी तशी
कृष्णाची सखी राधाच जशी
पण,
आज ती कुठं दिसत नाही
मनही माझे लागत नाही

प्रेमाचे खरंच असेच असते
जवळ असले की,
किंमत नाही…
लांब गेले की,
अश्रृच वाही..

प्रतिभा गौपाले नागपूर
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles