ॲड. गौतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे. एस. एम. महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

ॲड. गौतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे. एस. एम. महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अलिबाग प्रतिनिधी, तुषार थळे

अलिबाग: येथील जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि ६ डिसेंबर) जे एस महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम महाविद्यालयीन ग्रंथालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयातील बोटॅनिकल गार्डनचे उद्घाटन मा. ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष, अलिबाग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच जनता शिक्षण मंडळाच्या नूतन अध्यक्षीय कार्यालयाचे उद्घाटन मा श्री. सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील, मा. आमदार, विधानसभा- महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. साक्षी गौतम पाटील, कार्यवाह, श्री. गौरव पाटील, श्री. प्रमोद पाटील, अध्यक्ष दत्ता पाटील अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सौ शैलताई पाटील, संचालिका, जनता शिक्षण मंडळ, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षिप्रमाणे यंदाही जे एस. एम. महाविद्यालयातील एन. एस. एस. युनिट, एन. सी. सी. युनिट व HDFC बँक, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, एन एस. एस. स्वयंसेवक एन. सी. सी. कडेट्स व इतर विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदर रक्तदान शिबिरात एकूण 58 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ॲड. गौतम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्र. -प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, HDFC बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री निलेश मोरे व इतर बँक स्टाफ, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा शासकीय रक्तपेढी प्रमुख डॉ. दिपक गोसावी व इतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर यशस्वीपणे राबाविण्यात आले. महाविद्यलयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या द्रुष्टिने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळादेखिल आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्याचा सत्कार मा. अध्यक्ष, ॲड. गौतम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर मा अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles