डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘ज्ञानाचा खरा तळपता सूर्य’; सविता पाटील ठाकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘ज्ञानाचा खरा तळपता सूर्य’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“मोजू तरी उंची कशी तुमच्या कर्तृत्वाची
जगाला शिकविली व्याख्या तुम्ही माणुसकीची,
देव नव्हता, देवदूत नव्हताच
मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होता”

एखाद्या व्यक्तीला, समूहाला शिक्षण नाकारणं म्हणजे, माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय. अशा जाज्वल्य विचारांचे पाईक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शतशत नमन. “शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे”, हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे या विचारावर कार्य करतांना बाबासाहेबांनी उक्ती पेक्षा कृती श्रेष्ठ ठरवत कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदव्या मिळवल्यात. त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर निरंतर संशोधन केले. अर्थशास्त्रज्ञ ,प्राध्यापक, वकील या तिहेरी भूमिकेतील “बाबासाहेब म्हणजे, ज्ञानाचा खरा तळपता सूर्य होय.”

डॉ.बाबासाहेब यांचे कार्य शब्दात बांधणं कठीण आहे.मानवाला मानव म्हणून ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत. अस्पृश्यता, वर्णव्यवस्था व जातीभेदाचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणारे डॉ आंबेडकर हे पहिले समाजविधाते ठरले. धर्माच्या नावाने शतकानुशतके दलितांची होत असलेली पिळवणूक त्यांनी थांबवली. धार्मिकतेच्या जोखडातून समाज मुक्त केला. माणूस जन्माने नव्हे; तर कर्माने मोठा ठरतो हे समाजाला त्यांनी पटवून दिले. सामाजिक क्रांतीसाठी पाया हवा असेल तर, तो केवळ शिक्षणातून रचला जातो हे त्यांनी खूप आधीच ओळखले व सर्वांसाठी शिक्षणाचा समान अधिकार हवा यावर भर दिला. ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ ही उपाधी प्राप्त करताना चाळी चाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्यात.

ग्रंथ हेच गुरु,वाचाल तर वाचाल. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”. हे बाबासाहेबांचे विचार आजही समाजमान्य आहेत. आज सहा डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘महापरिनिर्वाण दिन’ या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “लोपला ज्ञानसूर्य” हा विषय देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुन्हा एकदा व्यासपीठ मिळवून दिले. आपण सर्वजण बाबासाहेबांच्या विचाराशी ज्ञात आहोतच. तरी आपल्या अनेकाविध व सुंदर अशा काव्य संकल्पनेतून आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेब साकारले गेलेत, त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला.तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. आणि पुढील लेखनास भरभरून हार्दिक शुभेच्छा..!

सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles