शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : चित्रसावली☄*
*🍂शनिवार : ०९ / १२ /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चित्रसावली*

साथसंगत सुटली तरी
प्रीत अमर ह्रदयांतरी
मीत माझा तूच खरा
गीत तुझेच ओठावरी.. //

ठरलोय औट घटिकेचे
जरी आपण राजाराणी
कशी विसरू तुझ्यासवे
गायलेली संसार गाणी.. //

जुळले होते सूर ताल
ठरले सारेच अल्पजीवी
येईल विराणी वाट्याला
नव्हते ध्यानी मनी गावी.. //

भास तस्वीर न्याहाळता
तुझी हलते छबी जराशी
वाटते एकाच क्षणासाठी
घेशील बिलगूनी उराशी..//

स्तब्ध तू अन् निःशब्द मी
दग्ध झालीय प्रेमकहानी
कटिबद्ध तरीही तुझ्याशी
सप्तपदीतल्या वचनांनी.. //

आज नसे जरी तू देहाने
उरलास अंश वंश रूपी
बळ जमवते त्याचसाठी
ही जरी विपरीत दैवगती.. //

मी चालेन या वाटेवरती
जी कधी तूच दाखवली
आता माझ्या सोबतीला
फक्त तुझी चित्रसावली.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

माझी चित्रसावली
माझ्या मागे येत होती
माथ्यावरच्या रविला
पाहुन पळत होती ॥१॥

क्षणात जवळ तर
क्षणात दूर जात होती
लपंडावाचा खेळ
सारखी खेळत होती ॥२॥

मी बसल्यावर ती पण
प्रामाणिकपणे बसत होती
माझी चित्रसावली
माझ्या मागे येत होती ॥३॥

मला सोबत करत
माझ्या संगे चालत होती
वाऱ्या बरोबर
माझ्या सवे डुलत होती ॥३॥

मावळतीच्या सूर्यास्तात
गुडुप होत होती
उद्या येण्याचे आश्वासन
देत जात होती ॥४॥

सांजेच्या शांत वेळी
मला सोडून जात होती
माझी चित्रसावली
माझ्या मागे येत होती ॥५॥

माझी चित्रसावली
माझ्या मागे थांबत होती
पहाटेच्या किरणां सवे
कुशीत शिरत होती ॥६॥

*© श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*”चित्रसावली”*

आठवण येता आईची
मी तिची चित्रे रेखाटली
घरातल्या प्रत्येक वस्तूवर
पडली तिची सावली ||१||

अशी चित्रसावली मग
येते रोज मला भेटाया
कंठ येतो दाटून आणि
स्मरते आईची माया ||२||

पाळण्याचे काढले चित्र
दिली आईच्या हाती दोरी
चित्रसावलीतूनही पडली
कानी आईची लोरी ||३||

स्वयंपाकघर चितारले जेव्हा
भोजनाचा आला स्वाद
चित्रसावली विसावली तेथे
घेऊन आईची याद ||४||

सडासंमार्जन सुप्रभाती अंगणी
रेखाटले जेव्हा मी चित्री
भूपाळी मज कानी पडली
जणू आई आल्याची खात्री ||५||

सगळ्यांसाठी राबताना
आई रेखाटली चित्रात
चित्रसावली दिसली मजला
आई माझी व्यस्त दिनरात ||६||

घरातल्या प्रत्येक प्रसंगाची
जेव्हा मी चित्रे रेखाटली
प्रत्येक चित्रसावलीत दिसली
मला माझी मायमाऊली ||७||

मायेच्या स्पर्शाने प्रत्येक वस्तू
झालीच होती पावन
चित्र रेखाटतो जेंव्हा
येतेच तिची आठवण ||८||

चित्रसावलीचा मज लाभला
रात्रंदिवस असा आधार
मस्तकी आशिर्वाद मिळाला
आता नाही मी निराधार ||९||

चित्रसावलीचा हा खेळ
सातत्याने सुरूच राहील
प्रत्येक चित्राच्या ठायी आता
मी माझ्या आईला पाहील ||१०||

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०९ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*चित्रसावली*

बालपणापासूनच
एकटी असली की सोबत
मलाकाहि सोडेना ती
सतत पाठीमागे लागत

बाबा गेले मला सोडून
आठवणीत डोळ्यासमोर
डोळे मिटले की अचानक
व्हायचे नजरेच्या दुर

आई होती सोबतीला
आईची माया ममतेची
जवळ घेऊन कुशीत
अंगाई गाऊन निजवायची

आईपण गेलीत सोडुन
आता राहिल्या आठवणी
उरात बाळगून साऱ्या
चित्र रेखाटते मनी

झोपेत स्वप्नात माझ्याशी
आईबाबा संवाद करते
डोळ्यांभोवती चित्रसावली
हसतमुख चेहरा भासते

*सौ पुष्पा डोनीवार बाबुपेठ वार्ड चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

कां राहतेस माझ्या
तू आसपास ,,,,,
वेदना होतात मला
ह्या माझ्या मनास

सोड मला एकांत
जगू दे मला एकांत
ते क्षण होते तेव्हाचे
हाल होतात जिवाचे

तूझी चित्रसावली बघून
ताज्या होतात वेदना
नको ते आठवतात
उभारी मिळतो वेदनांना

समाधान मानतो मी
स्वप्नात तुला बघून
दिसते तुझी चित्रसावली
उठून बसतो दचकून

का छेळतेस मला
आपल्या अदृश्य रूपाने
जगू दे मला आता
सुख समाधानाने

*केवलचंद शहारे,सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्र सावली*

अंबरातील त्या ढगांची
चित्रसावली न्याहाळतो
एकामागून एक ढग तो
कसा मंदगतीने धावतो

स्रुष्टीची किमया होती
कि निसर्गाचा कोप तो
गरज नसतांना सुध्दा..
अवकाळी पाऊस पडतो

ढगाळलेले हे वातावरण
जिकडे तिकडे पाऊस
अचानक कसं बदलून गेलं
हवामानाचा अंदाज अचूक

उन सावलीचे चित्र ते
अन् चित्र सावलीही ज्यात
पुस्तकातील चित्रे बघून
कल्पना करायची त्यात

चित्र सावली बघायला
त्या निसर्गाची हवीय मदत
कधी सावली कधी उन
निरीक्षणशक्ती सदा जागृत

*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

रोज माझ्या उशाला
उभी एक चित्रसावली
स्वप्नात येवून ती
आशीर्वाद देते माऊली

हयात नाही आता
ती चंद्र तारकात राहते
पाठवून शीतल किरणे
रोज मला पाहते

येता आठवण तिची
मी नभाकडे पाहतो
तिचीच ती नभाकृति
क्षणभर न्याहाळतो

स्मरतो चित्रसावली
घट्ट मिटून डोळे
राहु दे सुखात असाच
घालतो तीज साकडे

तिथेही आईबाबांची जोडी
सदा आमच्या काळजीत राहते
कधी बनून येती जलधारा
कधी आठवणीतून वाहते

*डॉ. संजय भानुदास पाचभाई*
*नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

दिसते मजला ठायी ठायी
प्रेमळ तुझी चित्रसावली
सदा देते समर्थ साथ तुझी
तूच माझी स्वामी माऊली

भिऊ नकोस मी आहे पाठीशी
हे शब्द देती जगण्याचा आधार
स्वामी तुझ्यामुळेच माझे
अवघे जीवन होईल साकार

सांगण्या आधीच कळतात तुला
अंतरीच्या माझ्या वेदना
नामस्मरण करता तुझे
पूर्ण होई सर्व मनोकामना

तुझ्या भक्तीने मन
माझे आनंदाने न्हाते
तुझ्या वरील विश्वास माझा
चिंता क्षणात दूर करते

हृदयात माझ्या ब्रह्मांडनायका
मूर्ती तुझी वसलेली
मनातील वादळे शमवते
बघता फक्त तुझी चित्रसावली

*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles