“मुक्या जीवांसाठी व्हावे माणुसकीचा समीर”; तारका रूखमोडे

मुक्या जीवांसाठी व्हावे माणुसकीचा समीर”; तारका रूखमोडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण_

‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’..या साने गुरुजींच्या ओळी..व ‘भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचे’..या ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ओळी आज चित्र बघून एकदम आठवल्या, किती मार्मिक ना ह्या ओळी..

खरंय.. माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे..माणसाच्या जीवनात उद्याची शाश्वती नाही..म्हणून स्वार्थात न डुबता परमार्थ साधावा.. भलेही असेल स्वतःकडे जरी घनघोर तिमिर…तरी मुक्या जीवांसाठी व्हावे माणुसकीचा समीर…जरी पोटात असेल माजलेले काहूर भुकेचे..तरी वाटून द्यावे जवळीचे चार दाणेही प्रसादाचे..तहानलेल्यास जल पाजावे..मुक्या जीवाशी स्नेह करावे.. अबोल भाव जाणून घ्यावे..स्वमुखीचा घास द्यावा..परमोच्च समाधानचा श्वास भरावा..हीच खरी मनाची श्रीमंती..हीच संस्कृती…व हीच खरी मानवता…

स्वतःच्या घासातील घास अबोल जीवास भरवतांनाचं हे बोलकं चित्र.. समोरचा श्वानही सुहास्य वदनाने तिच्या अंतरंगातील भावनांना किती ममतेने बघतोय..तिच्या घासरुपी आवरणातून परमेश्वराचंंच वात्सल्य पाझरतंय जणू ..हेच ते भूतदयेच्या, मानवतेच्या लेण्याचं समाधान.. जे आत्मिक समाधान देणारं…!

‘जे जे भेटीजे भूत_ ते ते जाणिजे भगवंत’ इतका परमोच्च भाव आपल्या अवतीभवती असलेल्या प्राणीमात्रांविषयी बाळगावा हाच मानदंड संत गाडगे महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा विविध संतांनी व डाॅ. प्रकाश आमटे यांनीअंगीकारला.भूतदया म्हणजेच खरी मानवता होय.

मनामनातली माणुसकी जागविण्यासोबत संवेदना, भूतदयेचा संस्कार रुजविण्याचीही गरज निर्माण झालीये. ह्याच भावनेतून जिव्हाळा, सख्य, ह्यांचे अंकुरण व्हावे ते शब्द माध्यमातून मानवतेचे रोपटे उगवून लेखणीतून उदात्त भाव उतरावेत म्हणून कदाचित आ. राहुल सरांनी चित्र दिलेले. आपणही आपल्या लेखणीतून कुणी निस्वार्थ प्राणीप्रेम टिपले, कुणी वृद्धापकाळचा श्वानाचा जिव्हाळा सहारा वर्णीला, कोणी प्राण्यांची भूक जाणण्याचं मर्म, तर कोणी भुकेल्या पोटाची जाण रेखाटली, तर कोणी स्वतः उपाशी राहून इतरांसाठी घास भरवणारा परोपकार रेखाटला तर कोणी संस्कृतीचा मोठेपणा जपला. आपण सर्व हायकू रचनाकार उत्तरोत्तर अधिक दर्जेदार हायकू तयार करत आहात याचा सार्थ अभिमान आहे.

*थोडसं मनातलं…*

वर्णनालाच महत्व न देता तिच्यातील वर्तमान क्षण पकडून ५ _१२ अथवा १२_५ या आकृतीबंधात आशयघन कलाटणीसह हायकू रेखाटन करा. त्यासाठी आदर्श वाचन, चिंतन, मनन अत्यावश्यक ..आज सहभागी झालेल्या सर्व प्रतिभावंत साहित्यिकांचे अभिनंदन असेच लिहिते व्हा👍💐💐 आ. राहुल सर आपण मला परीक्षण लिहिण्याची संधी दिली, आपले हृदयस्त आभार🙏

सौ. तारका रूखमोडे
अर्जुनी मोर,जि. गोंदिया
मुख्य परीक्षक व सहप्रशासक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles