‘जागतिक संघर्ष टाळण्यासाठी सर्वांनी पाणी बचतीचा संकल्प करावा’; प्रदीप विघ्ने

‘जागतिक संघर्ष टाळण्यासाठी सर्वांनी पाणी बचतीचा संकल्प करावा’; प्रदीप विघ्ने



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मोहपा येथे जागतिक जल दिवस साजरा_

नागपूर/ मोहपा : येथील बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात (दि.२२) ‘जागतिक जल दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व ग्रीन क्लबच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालय प्राचार्य डॉ.एम.व्ही.कोल्हे, तर मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप नारायणराव विघ्ने सहाय्यक शिक्षक नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोहपा, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.अलका थोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते प्रदीप विघ्ने यांनी ‘जागतिक जल दिवस’ विषयावर आपले विचार व्यक्त केले. जल है तो,कल हैं भविष्यात पाणीटंचाई हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार आहे. पावसाचे कमी प्रमाण, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे, पाण्याचा अपव्यय, वृक्ष-तोड, शहरीकरण, सिमेंटचे रस्ते, लोकसंख्या वाढ इत्यादीमुळे पाण्यासाठी जागतिक संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी व मानवी जीवनात शांतता राहावी यासाठी सर्वांनी पाणी बचतीचा संकल्प घ्यावा, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

पाणी मानवी आयुष्यात किती महत्त्वाचे आहे.पाण्याशि-वाय माणूस जगू शकणार नाही,त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना कशा प्रकारे करावा.त्यासाठी पाण्याची बचत करा.असा मनोदय कार्यक्रम अध्यक्ष डॉ.एम.व्ही.कोल्हे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशद करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रमोद वडते म्हणाले,भविष्यामध्ये पाण्यासाठी युद्ध होऊ नये,म्हणून आपण पाण्याची बचत केली पाहिजे.ही चळवळ एका दिवसाची नसून निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.अशी प्रास्ताविकातून मांडणी केली.

याप्रसंगी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२४ चे मानकरी प्रदीप नारायणराव विघ्ने यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एम.व्ही.कोल्हे यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.अलका थोडगे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार-२०२४ प्राप्त झाल्यामुळे त्यांचाही शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनोद भालेराव तर आभार प्रा.सचिन काळे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ.लिलाधर खरपुरिये डॉ.धनंजय देवते, प्रा.अनिता गणोरकर, प्रा.सिद्धार्थ चनका-पूरे, प्रा.शैलेष हातगुडे, संजय गणोरकर, शुभम वाघ,चेतन सुपले,अजय आंजनकर, अरविंद डाहाट, प्रकाश कोकड्डे, रजनी गणोरकर आदींनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles