‘समाजमाध्यमाची जुनी कला…. घेऊन येई दवंडीवाला…!’; वैशाली अंड्रस्कर

‘समाजमाध्यमाची जुनी कला…. घेऊन येई दवंडीवाला…!’; वैशाली अंड्रस्कर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

ऐका हो तुम्ही ऐका !
ऐका हो ऐका !!
आजपासुनी सर्व बोलणे
व्हावे केवळ गाणे गाणे.
केवळ गाणे आणि तराणे
चालणार नच इतर फलाणे
राजाज्ञा जो मोडिल कोणी
देऊ सुळावर त्यास तत्क्षणी
ऐका हो ऐका….

ज्येष्ठ लेखक नाटककार द. मा. मिरासदार यांच्या ‘अति तिथं माती’ या विनोदी नाटकातील हा दवंडीचा प्रसंग. चक्रमादित्य राजाच्या दरबारात आलेले गवईबुवा बक्षीस म्हणून गाण्याला चांगले दिवस यावेत अशी विनवणी करतात. तेव्हा राज्यातील संपूर्ण लोकांनी गाण्यातच बोलावे अशी सूचना राजा दवंडीवाल्याच्या हाताने लोकांना देववितो. राजाचा आदेशच तो….पण त्यामुळे घडणारे विविध प्रसंग आपल्याला पोट धरून हसायला लावतात. मग तो बाजारातील व्यवहार असो वा नवराबायकोचे भांडण असो…. किंवा राणीला सर्दीपडसे झाल्याची बातमी असो….सारंकाही गाण्यातच सांगताना उडणारे हास्याचे फवारे म्हणजे विनोदाची पर्वणीच…!

हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे मराठीचे शिलेदार समूहात माननीय मुख्य प्रशासक श्री. राहुल पाटील यांनी शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेघ्या निमित्ताने दिलेला ‘दवंडी’ हा विषय. फार वर्षांपूर्वी तसेच भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा आताच्या सारखी वेगवान समाजमाध्यमे ( Social Media ) अस्तित्वात नव्हती. त्याकाळी राजे महाराजे, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आदेशांना लोकांपर्यंत पोहचविण्याचा सुलभ मार्ग म्हणजे ‘दवंडी’.

बालपणी आम्ही सुद्धा ही दवंडी अनुभवलेली आहे. एका पितळी किंवा लोखंडी थाळीवर धातूच्या दांडीने ठणठण वाजवत लोकांना गोळा करायचे आणि ‘ऐका हो ऐका’ अशी हाळी देत सरकारी आदेशांना जनतेपर्यंत पोहचविणे अशी महत्वाची जबाबदारी यामुळे पार पाडली जायची. पण काळ बदलला तशी दवंडी कालौघात मागे पडत गेली आणि आता फक्त आठवणी उरल्यात.

बऱ्याच शिलेदारांनी दवंडी अर्थात सार्वत्रिक पोहचविला जाणारा निरोप या अर्थाला अनुसरून रचना केल्यात तर काहींनी दवंडी म्हणजे गाजावाजा करणे…बढाई मारणे या अर्थाने सुद्धा रचना साकारल्यात. काही शिलेदारांनी सद्यस्थितीतील राजकीय तथा सामाजिक परिस्थितीवर भाष्य करीत दवंडी साकारण्याचा प्रयत्न केला. सर्वांचेच प्रयत्न खूप छान….पण अपेक्षेप्रमाणे रचनांची संख्या फारच कमी होती. दवंडी शब्दाचा अधिकचा अर्थ जाणून घेताना समाजमाध्यमांत ‘जागल्या’ असाही एक अर्थ दिलेला आहे. मात्र दवंडीवाला आणि जागल्या यात महद्अंतर आहे. जागल्या हा पहारेकरी या अर्थाने तर दवंडी हा निरोप्या या अर्थाने आलेला शब्द…. तेव्हा अचूक शब्द आणि अर्थ यांचा मेळ घालून आशयघन रचनांच्या लेखनास सर्वांना भरभरून शुभेच्छा….!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles