बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : क्षुधा तृप्ती🥀*
*🍂बुधवार : २७ / मार्च /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*क्षुधा तृप्ती*

धरती अंबर पायाखाली
झेप तुझी नभास व्यापी
चंद्र, मंगळ कवेत आले
धन्य ज्ञान विज्ञान क्रांती.. //

इथे लाखो प्राणी जाती
एक अलग तू बुद्धिवादी
त्याच बळे केली ख्याती
कर्तृत्वाची अपार यादी..//

तू गूढ,गहन,रहस्य भेदी
हर घडी नवी लाभे युक्ती
पृथ्वीचीही होईल माती
अशी शोधली अणुशक्ती.. //

जिज्ञासा की ही लालसा
योगी की, तू विकृत रोगी
आत्मवंशातच भेद निती
होवू पाहशी ब्रम्हांड भोगी.. //

मूठभरांच्याच मुठीत सूत्रे
अशीच ही कुटिल क्लृप्ती
बाळसे धरी स्वार्थी वृत्ती
होता होईना क्षुधा तृप्ती.. //

साध्य व्हावे विश्वकल्याण
कर ऐसी तू ज्ञान साधना
हर जीवजंतू नांदो सुखाने
हीच मनामनात आराधना.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

आईच्या दुधाची क्षुधा कधी
पिठाचे पाणी भागविते
निरागस बालपण
क्षुधा तृप्ती समजून पिते

वय वाढता वाढता
क्षुधा विस्तीर्ण भासते
फाटकी गोधडी पसरता
क्षणभर ती विसावते

कितीतरी रंग क्षुधाचे
तन-मन-धनही अपूर्ण त्यापुढे
मनधरणी कुणाची करायचे
एक भागे,एक डोकी वर काढे

क्षुधा तृप्ती करण्या
‘नरा’चा ही रावण होई
असाही जन्मतो महात्मा
राजाचा रंक होऊनिया
समाधानाचा आनंद घेई

*सौ. ज्योती सुधीर कार्लेवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

क्षुधा मानवाचा स्वभावधर्म
तृप्ती करीते त्याचे दमन
वदनी कवळ घेऊनी
करावे नित्य आचमन

कर्म फलाची नसावी अपेक्षा
सदा रहावे कार्यमग्न
क्षुधा असावी यशप्राप्तीची
मनी होऊ नये कधी उद्विग्न

कर्तव्यासी मुकता बुडतो
कार्यभाग तो सगळा
सदा कार्यप्रवण राहून
उमटवा ठसा आगळा

क्षुधेलागी अनेक नावे
त्यासाठीच का तल्लीन व्हावे
क्षुधाशांतीचा मार्ग आपला
आपणच तो शोधीत जावे

क्षुधा पूर्ती असावी स्वप्नांची
मनी असावी नवप्रेरणा
क्षुधा तृप्ती होईल आपसूक
असेल जर सुंदर योजना

कुणा क्षुधा पोटाची
कुणा क्षुधा मांगल्याची
कुणा क्षुधा अस्तित्वाची
कुणा क्षुधा साहित्याची

क्षुधा तृप्तीचे मार्ग अनेक
कधी कष्टसाध्य कधी सरळ
आपला मार्ग आपणच शोधावा
झटकून द्यावी सारी मरगळ

चोखंदळ आपले कार्य असावे
निरिच्छ तो प्रयास नको
क्षुधा तृप्ती हा ध्यास असावा
व्यर्थ फक्त हव्यास नको

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

झाली न या जीवनी
मन भरून कधी प्राप्ती
जेव्हा जेव्हा मी आनंदी
दु:खाची सदैव जप्ती

अजून खूप बाकी
माझे जगणे आहे
अकाली नकोस नेऊ
जगण्यावर मरणे आहे

खूप आहेत मनिषा
या पोरक्या मनाच्या
अजून फुलणे आहे
सहवासात बहराच्या

अजूनही अधूरी
खंत मनात आहे
चार भिंतीत बंद
निसर्गात रमणे आहे

शब्द अधूरेच आणखी
हाती लेखणी अडलेली
शब्द जुळवतांना ती
का अशी अडखळलेली

सत्य मांडणे अजून
शब्दांचे बाकी आहे
क्षुधा तृप्ती न झाली
लिहणे बाकी आहे

*शर्मिला देशमुख घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

चकचकीत उड्डाणपूल उभारून
आम्ही म्हणतोय,
” रहदारीचा मार्ग सुलभ झाला ”
त्याच उड्डाणपूलाखाली,
जिर्ण वसनातील, पापड झालेले पोट पाहून वाटते,
” दारिद्र्यही मलूल झाला ”
परग्रहावर वस्तीचे स्वप्न
आमच्या उराशी..
यांच्या नशिबी स्व हक्काची
भिंतही नाही कुडाची…
कुठवरी चालेल ही,
भटकंती प्रारब्धाची… ?
होईल का क्षुधा तृप्ती,
यांच्या मुलभूत गरजांची..?
की अशीच वाढत जाईल,
इथली दिन- धनिकातील दरी..?
क्षुधा तृप्ती व्हावी सर्वांचीच,
आशा उजळेल का हर उरी..?
मागणे एकच देवा
तुझ्या चरणी मी मागते,
“जीवजंतू, प्राणीमात्रांना
विपुल दे दाणापाणी”
एवढेच तुला मी सांगते…
क्षुधा तृप्ती अन्नपाण्याची
व्हावी सर्वांचीच…
सारी तुझीच लेकरे देवा
ना व्हावी कुणात उच- नीच

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

ध्येयाने पछाडलेला आहे
होईल कशी क्षुधा तृप्ती?
धैर्याने सामोरे जात आहे
येऊ दे किती ही आपत्ती…

करीत संकटाचा सामना
मी पुढे पुढेचं सरसावतो,
निर्भिड होऊनी लढतांना
परिस्थिती जुळवून घेतो…

अनुभवला तो पावसाला
सोसल्या उन्हाच्या झळा,
थंडीत कुडकुडत जागलो
बदलून गेलीय अवकळा…

नाही शमणार भूक माझी
थोड्या मिळालेल्या यशाने,
स्वप्न आकाशा गवसणीचे
पुर्ण करील मोठ्या हौसेने…

नका मानू मज कुप मंडूक
अभिलाषा व्यापक अर्थाने,
बाळगून आहे स्वप्नं उराशी
परिपूर्ती करील मी जिद्दीने…

रंगवलेली स्वप्ने मनातील
साकार करील स्व कष्टाने,
क्षुधा तृप्ती होईल मनाची
भासणार नाही काही उणे…

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

ऊन लागली तापायला
पाण्याची झाली चणचण
पाण्यासाठी फिरती स्वैर
पशुपक्षी करतात वणवण

व्हावी सर्व जीवांची क्षुधातृप्ती
विचार आपण करायला हवा
झाडावरती किवा अंगणी
टांगून ठेवू पाण्याचा टिटवा

गुराढोरांसाठी बाहेर अंगणी
करू या पाण्याची व्यवस्था
तहान भागेल मुक्या जीवाची
होणार नाही त्यांची दुरावस्था

काही ठिकाणी मानवांना
मिळत नाही पुरेसे पाणी
समस्या त्यांच्या दुर करून
होईल आत्मा समाधानी

पाणी म्हणजे जीवन
सहज मिळावे प्रत्येकाला
अवाजवी वापर टाळून
सोय करावी साठवायला

टाळावे पाणी प्रदुषण
स्वच्छ ठेवणे जबाबदारी
प्रत्येकाने ठेवावी जाण
फुलेल स्वर्ग धरणीवरी

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles